mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! राज्यात आणखी ‘एवढे’ दिवस पावसाळी वातावरण असणार; काळजी घेण्याचे आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 20, 2021
in राज्य
शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

टीम मंगळवेढा टाईम्स ।

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे.

किनारपट्टीच्या भागात एक ते दोन दिवस जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

बंगालच्या उपसागरापाठोपाठ गेल्या दोन दिवसांत पूर्व-मध्य अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

सध्या हे क्षेत्र तीव्र झाले असून, अरबी समुद्रातून उत्तर महाराष्ट्रमार्गे पश्चिम मध्यप्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या सहा दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई आणि पुण्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत सोलापूर, सांगली, महाबळेश्वर आणि कोकणात काही भागांत पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यात एक ते दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार असून, २३ नोव्हेंबरनंतर या भागात हवामान कोरडे होणार आहे. विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण विभागात कायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागांत पावसाळी वातावरण राहणार आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाळी वातावरण राहणार आहे.(स्रोत;लोकसत्ता)

आंध्रप्रदेशात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू तर १०० जण बेपत्ता

आंध्रप्रदेश राज्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण बेपत्ता झाले आहेत. वायूदल, ‘एस्.डी.आर्.एफ्.’ आणि अग्नीशमन दल यांच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी दूरभाषवरून संवाद साधला आणि पूरस्थितीचा आढावा घेऊन ‘राज्याला सर्वोतोपरी साहाय्य केले जाईल’, असे आश्‍वासन दिले.

मुसळधार पावसाने नद्या आणि नाले यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावे पुराने वेढली गेली आहेत. काही ठिकाणी रस्तेही वाहून गेले आहेत.

तिरुमला येथील डोंगरांवरून वहाणार्‍या पाण्याचे रौद्ररूपही येथे पहायला मिळत आहे. तिरुपतीच्या बाहेरील स्वर्णमुखी नदीला पूर आला आहे. पुरामुळे परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर आणि जेसीबी यांचे साहाय्य घ्यावे लागत आहे.

कडप्पा जिल्ह्यातील अन्नामय्या परियोजनेतील बांध फुटल्यामुळे अचानक पूर आला आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी येथील शिवमंदिरात पूजा करण्यासाठी गेलेले भाविक अचानक आलेल्या पुरामुळे अडकले, तर काही जण वाहून गेले. बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी बचाव अभियान चालू आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवकाळी पाऊस

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ

January 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 5, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 4, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमा; अ.भा. सरपंच परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

January 2, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठं विधान केलं.., वाचा नेमकं काय म्हणाले

January 1, 2026
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घरफाळा, पाणीपट्टीमध्ये ‘एवढे’ टक्के सवलत; नव्याने शासन निर्णय जारी

January 3, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

10वी, 12 वी परीक्षेच्या 1 महिनाआधी बोर्डाने घेतला मोठा निर्णय; विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम? आताच जाणून घ्या..

January 1, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

थर्टी फर्स्टला दारू पिऊन झिंगणाऱ्यांची निघोज गावच्या महिला गाढवावरून काढणार धिंड; संपूर्ण दारूबंदीसाठी धाडसी निर्णय

December 31, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा झटका, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं; योजनेबाबत मोठी अपडेट

December 30, 2025
Next Post
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

धडाकेबाज कामगिरी! उजनी वसाहत पंढरपुर येथील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाची कारवाई; 10 निवासस्थाने केली रिक्त

धडाकेबाज कामगिरी! उजनी वसाहत पंढरपुर येथील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाची कारवाई; 10 निवासस्थाने केली रिक्त

January 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ

January 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Breaking! बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृताच्या कुटुंबाविरोधातच गुन्हा दाखल

January 5, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आज घेणार पदभार; अपेक्षा अन् आव्हानाची होणार कसोटी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

January 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा