mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक : भाडे दिले नाही म्हणू मालकाने महिलेला दिले पेटवून

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन।  कोरोना महामारीमुळे देशातील असंघटित कामगार बेरोजगार झाल्याने मरणयातना भोगत आहेत. अशीच अवस्था सर्वच क्षेत्रात असताना लोकांच्या घरची धुणीभांडी काम करून आपला चरितार्थ चालणार्‍या घरकामगार महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक मधील एका घरकामगार महिलेने घर मालकाला घर भाडे दिले नाही म्हणून या घर मालकाने त्या महिलेला जिवंत पेटून दिले. Nashik The landlord fired the woman for not paying the rent

नाशिक मध्ये राहत असलेली घरकाम करून आपल्या कुटुंबाचे कसेबसे पोट भरणारी घरकामगार  “आयेशा” नावाची महिला लॉकडाऊन परिस्थितीमुळे घरमालकाला घर भाडे देऊ शकली नाही. घरकामगार “आयेशा” हिने घर भाडे दिले नाही म्हणून संतापलेल्या घरमालक आणि त्याचा नातेवाईक यांनी आयेशाला जिवंत पेटवून दिले. घरकामगार “आयेशा”  जिवंत जळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

लॉकडाऊन काळामध्ये घर कामगारांचे काम बंद पडले, रोजगार बुडाला, कुठललेही उत्पन्न नाही अशा परिस्थितीत घर कामगार, त्यांचे कुटुंब कसेबसे चालवीत असताना घर मालक त्यांच्याकडे भाड्यासाठी तगादा लावतात. अगोदरच त्रस्त असलेल्या घरकामगारांना घरभाडे देणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने सरकारने राज्यातील  घर कामगारांसह असंघटित कामगारांना थेट दरमहा १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले पाहिजे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना भविष्यात वाढतच राहतील यायची दाखल सरकारने तात्काळ घ्यावी. अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  डॉ.डी एल कराड आणि  राज्य सरचिटणीस एड. एम एच शेख यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि  राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे.

या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने पुढे येऊन या वर्गाला थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला पाहिजे. तसेच या  सर्व कामगारांना केंद्र आणि राज्य सरकार यांनी दरमहा १० हजार रुपये आर्थिक सहाय्य केले पाहिजे अशी मागणी सर्व कामगार संघटनांनी सरकार कडे केली आहे.

तसेच  घरकामगारांसाठी सेवा शर्ती लागू करणारा व किमान वेतन देणारा कायदा करावा, त्यांचे कल्याण मंडळ साठी कर्मचारी वर्ग देऊन सर्व घर कामगारांची नोंदणी करावी व त्यामार्फत कल्याणकारी योजना व सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात अशी मागणी कामगार संघटनांनी वेळोवेळी केली आहे .

मात्र केंद्र व राज्य सरकारने याबाबत कुठलीही पावले उचललेली नाहीत.याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही अशी नाराजी कामगारनेते डॉ. कराड यांनी व्यक्त  केली आहे. 

कामगार आत्महत्या करत आहेत

२४ मार्चच्या लाक डाऊन नंतर राज्यातील घरकामगार, बांधकाम मजूर ,असंघटित कामगार, रिक्षाचालक, सलून कारागीर, दुकाने कामगार टपरीधारक अशा असंघटित वर्गाला उत्पन्न बुडाल्याने अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे . या संघटित कामगार कारागिरांना या ३ महिन्यांमध्ये सरकारने कुठलीही थेट आर्थिक मदत न केल्यामुळे ते मरणयातना भोगत आहेत. हे कामगार हवालदिल झाले आहेत .घर भाडे कुठून द्यायचे, किराणा कसा भरायचा, दैनंदिन खर्च कसा भागवायचा असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर आहेत. अशा परिस्थितीत घर मालकांनी तगादा लावल्यास बेघर व्हावे लागेल या भीतीने घर कामगार नैराश्यग्रस्त झाले आहेत. पुणे मुंबई अशा अनेक ठिकाणी  हे असंघटित कामगार आत्महत्यां करत आहेत. अशी तक्रार कामगार नेते  डॉ.डी एल कराड यांनी राज्य सरकारला केली आहे.

घर कामगाराना अजूनही कामावर प्रवेश बंदी

अजूनही घरकामगारांना कामावर बोलवण्यात येत नाही. अनेक सोसायट्यांमध्ये घरकामगारांना अद्यापही प्रवेश बंद आहे. सरकारने वेळोवेळी जाहीर करूनही या परिस्थितीत बदल होत नाही आणि या घरकामगार आणि असंघटित कामगार यांची उपासमार सुरूच आहे. अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeLatest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
Corona virus : देशात नवे १९,१४८ कोरोनाबाधित

Corona virus : देशात नवे १९,१४८ कोरोनाबाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आता तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आता तुमच्या भेटीला

March 11, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा