मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील कुसुमांची मंडल नायकनगुडेम येथील एका खासगी शाळेत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

शाळेत शिकणारा UKG चा सहा वर्षांचा विद्यार्थी मेदरापाऊ विहार याचा अपघाती मृत्यू झाला. पळत असताना विहार अचानक घसरून पडला आणि हातातील पेन्सिल त्याच्या घशामध्ये घुसली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, शाळेतील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शौचालयातून परतताना घडला अपघात
बुधवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास दुपारच्या सुट्टीदरम्यान विहार शौचालयाचा वापर करून वर्गात परतत होता. यावेळी धावत असताना तो अचानक घसरून पडला. त्याच्या हातात असलेली पेन्सिल थेट त्याच्या घशात घुसली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि विहार गंभीर जखमी झाला.

रुग्णालयात नेत असताना मृत्यू
अपघातानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेतून त्याला खम्मम येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलवले. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच विहारचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पेन्सिल त्याच्या श्वसननलिकेत घुसल्याने अंतर्गत रक्तस्राव झाला तसेच श्वासोच्छ्वासात अडथळे निर्माण झाले, ज्यामुळे त्याचा जीव वाचू शकला नाही.

पोलीस तपास सुरू
या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून, अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील निष्काळजीपणा किंवा सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी होत्या का, याचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















