टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर ग्रामीण भागातील सर्वत्रिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी, २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये मनाई आदेश लागू झाला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, भाले, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे,
कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करण्यास मनाई आहे.
असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर नीती विरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हें कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे असे आदेशात म्हटले आहे.
निवडणूक कर्नाटक विधानसभेची; सोलापुरातील दारू दुकाने बंद!
कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असलेल्या, सोलापूर जिल्ह्यातील ५ कि.मी. हद्दीतील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तालुक्यांतील दारू दुकाने व परमिट रूम (अनुज्ञप्त्या) बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.
कर्नाटक राज्यातील विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. महाराष्ट्र मद्य निषेध कायदा १९४९ च्या कलम १४२ अन्वये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्नाटक
जिल्ह्यातील ५ कि.मी. हद्दीतील देशी दारू (सीएल-३), विदेशी दारू (एफएल- २), बंद बाटलीतून बीअर विक्री करण्याची अनुज्ञप्ती (एफएलबीआर- २), परवाना कक्ष (एफएल-३), ताडी (टी.डी. १) या अनुज्ञप्त्या ८ मे २०२३ रोजी सायंकाळी ६.०० पासून १० मे २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
शिवाय मतमोजणीच्या दिवशी १३ मे २०२३ रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याबाबतचे आदेश देत आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित विक्रेत्याचा (अनुज्ञप्तीवर) परवाना निलंबित केला जाईल; अथवा रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज