टीम मंगळवेढा टाईम्स ।
सव्वा लाखाला फोन पे वरून दोघा भावांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना दि.२८ ऑक्टोंबर २०२१ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चन्नम्मा नगर सैफुल विजापूर रोड सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी विशाल सिद्धय्या हिरेमठ (वय ३२ , रा . कित्तूर चनम्मानगर , सैफुल विजापूर रोड , सोलापूर ) विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून अमित कुमार व एक अज्ञात इसम ( पुर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांना अमित कुमार नावाच्या व्यक्तीने फोन करून मी तुमचा पुणे वाघोली येथील फ्लॅट मध्ये भाड्याने राहण्यास तयार आहे परंतु माझे साहेब बोलणार आहेत असे म्हणाला.
त्यानंतर आमचे साहेब जसे सांगतील तसे इंटरॅक्शन फॉलो करा. असे सांगून दहा ते पंधरा मिनिटाने फिर्यादीच्या फोनवर लिंक आलेल्या मोबाईल क्र ८३१८५१५८०५ वर नंबर वर फोन करून किंवा आर कोड फिर्यादीच्या भावाच्या व्हाट्सअपला पाठवून फिर्यादीच्या फोन पे वरून क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले.
आमच्या मिलिटरी मध्ये असेच सिस्टीम आहे तुम्ही जितके पैसे पाठविता तितके पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडीट होईल असे बतावणी करून संशयित आरोपी अमितकुमार याने जसे सांगेन तसे प्रोसेस करून फिर्यादीच्या अकाउंट मधून ९ ० हजार रुपये काढले.
तसेच फिर्यादीचा भाऊ सागर यांच्या अकाउंट मधून २५ हजार रुपये काढून घेतले असे मिळून एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांची दोघा भावांची फोन पे वरून फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जगताप हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज