mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पणसाठी; मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री येणार तारीख ठरली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 24, 2025
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
अभिमान! छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा परिसर सुशोभीकरणाचे माजी सैनिक व जेष्ठ नागरिकांच्या भूमिपूजन; दगडाची घडण करून ऐतिहासिक रूप साकरण्यात येणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

मंगळवेढा शहरात लोकसहभागातून उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोहळा दि.26 ऑक्टोबरला होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.

शहरांमध्ये अनेक संतांचे वास्तव लाभल्याने संताची भूमी म्हणून मंगळवेढा शहराची ओळख राज्यभर निर्माण झाली.अशा परिस्थितीत शहरात 360 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज विजापूर स्वारीवर जात असताना शहरातील भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांनी मुक्काम केला.

अशा पदस्पर्श झालेल्या झालेल्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा व्हावा ही येथील शिवभक्ताची मागणी होती त्यासाठी अनेक वेळा बैठका झाल्या परंतु त्याची अद्याप यश आले नाही.

आ.अभिजीत पाटील यांनी स्वखर्चातून पुतळा उभा करून देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र येथील मराठा बांधवांनी पुतळा उभारणीमध्ये सर्व समाज बांधवांचा सहभाग असावा या भावनेतून लोकसहभागातून उभा करण्याचा शेवटी निर्णय घेतला त्यानुसार तब्बल 31 लाख रुपये लोकसभागातून जमा करण्यात आले.

त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 फुट उंचीची 4.5 टन वजनाची अश्वारूढ पुतळ्याची उभारणी मूर्तीकार महेंद्र धोपटे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली गतवर्षी हा पुतळा पुण्यावरून आणून मंगळवेढा शहरात ठेवण्यात आला.

शेवटी सुशोभीकरणासाठी शासनाने 75 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर याचे काम सुरू झाले.

नगरपालिका निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे लोकार्पण करण्याचा घाट येथील सकल मराठा समाज बांधवांनी घेतला त्या संदर्भात आ.समाधान आवताडे यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्याबरोबर मराठा आंदोलन मनोज जरांगे-पाटील, सार्वजनिक बांधकाम बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खा. संभाजी राजे यांना या पुतळा लोकार्पण समारंभासाठी आमंत्रित करण्यावर एकमत झाले.

त्यानुसार सकल मराठा बांधवांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन आंदोलन मनोज जरांगे-पाटील यांना याबाबतचे निमंत्रण देण्यात आले व त्यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला.

यावेळी सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर कोंडूभैरी, वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू, प्राध्यापक विनायक कलुबर्मे आदी उपस्थित होते.

शहराच्या सौंदर्यामध्ये भर

लोकसहभागातून पुतळ्याची उभारणी केल्यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये भर झाली. पुतळ्यामुळे शहराला भेट देणाऱ्या बाहेर गावच्या नागरिकांच्या मनामध्ये आशादायक चित्र निर्माण करतील.अशा स्वरूपाची निर्माण केले आहेत. यामध्ये सर्व लोकांचा चांगला सहभाग मिळाला.- अजित जगताप, अध्यक्ष अश्वारूढ पुतळा समिती

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! मनोज जरांगे पाटलांविरोधात हत्येचा कट: हा कट खूप मोठ्या व्यक्तीने रचलाय, जरांगेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

November 7, 2025
नागरिकांनो! आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही, पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत; अभिजीत पाटील‌ यांनी केले आ.आवताडेंवरती गंभीर आरोप

शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

November 7, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

सोलापूर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुका; काही ठिकाणी तहसीलदार तर काही ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना जबाबदारी; तुमच्या पालिकेत कोण? जाणून घ्या…

November 7, 2025
भव्य स्वप्नपूर्ती! लोकवर्गणीतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे समस्त मंगळवेढेकरांचे हस्ते थाटात लोकार्पण

शिवप्रेमी चौक पुढील काळात मंगळवेढ्याचा अभिमान ठरणार; शिवभक्तांचा ऐतिहासिक निर्णय : अश्वारूढ परिसराचे नामकरण…; शिवतीर्थात दररोज घुमणार शिवगर्जना

November 7, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शिक्षक, पदवीधर मतदार नोंदणीचा आज शेवट दिवस; जास्तीत-जास्त नोंदणी करून घेण्याचे तहसीलदार मदन जाधव यांचे आवाहन

November 6, 2025
नागरिकांच्या आग्रहास्तव रेखा प्रकाश खंदारे उमेदवारी अर्ज दाखल करणार; प्रभाग क्रमांक ३ मध्ये रंगणार हाय व्होल्टेज लढत; पतीची सामाजिक बांधिलकी पत्नीच्या कामी येणार

नागरिकांच्या आग्रहास्तव रेखा प्रकाश खंदारे उमेदवारी अर्ज दाखल करणार; प्रभाग क्रमांक ३ मध्ये रंगणार हाय व्होल्टेज लढत; पतीची सामाजिक बांधिलकी पत्नीच्या कामी येणार

November 6, 2025
लिहून घ्या..! आमदार समाधान आवताडे भाजपचे आमदार असल्यामुळे मंगळवेढा नगरपालिकेचा नगराध्यक्ष आमच्याच पक्षाचा होणार; शशिकांत चव्हाण यांच्याकडे अधिकृत ‘एबी’ फॉर्म दाखल

लिहून घ्या..! आमदार समाधान आवताडे भाजपचे आमदार असल्यामुळे मंगळवेढा नगरपालिकेचा नगराध्यक्ष आमच्याच पक्षाचा होणार; शशिकांत चव्हाण यांच्याकडे अधिकृत ‘एबी’ फॉर्म दाखल

November 6, 2025
भोंदूबाबा! मंगळवेढ्यात गुप्तधन काढून देण्याचा बहाणा करणाऱ्या महाराजाच्या मुसक्या आवळल्या; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

बाबो..! भोंदूबाबाच्या नादाला लागून उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी; मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी परदेशातील घर, फार्महाऊसही विकलं

November 6, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

उमेदवारांनो..! नगरपरिषद, नगरपंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील? निवडणुकांच्या प्रचार खर्चावर मर्यादा; मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्याचे आढळल्यास…

November 6, 2025
Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकरी चिंतेत! पुन्हा पावसाचा जोर वाढला, 'या' दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु; सोलापुरात मागील एक तासापासून तुफान पावसाची हजेरी

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! मनोज जरांगे पाटलांविरोधात हत्येचा कट: हा कट खूप मोठ्या व्यक्तीने रचलाय, जरांगेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

November 7, 2025
नागरिकांनो! आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही, पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत; अभिजीत पाटील‌ यांनी केले आ.आवताडेंवरती गंभीर आरोप

शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

November 7, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

सोलापूर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुका; काही ठिकाणी तहसीलदार तर काही ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना जबाबदारी; तुमच्या पालिकेत कोण? जाणून घ्या…

November 7, 2025
भव्य स्वप्नपूर्ती! लोकवर्गणीतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे समस्त मंगळवेढेकरांचे हस्ते थाटात लोकार्पण

शिवप्रेमी चौक पुढील काळात मंगळवेढ्याचा अभिमान ठरणार; शिवभक्तांचा ऐतिहासिक निर्णय : अश्वारूढ परिसराचे नामकरण…; शिवतीर्थात दररोज घुमणार शिवगर्जना

November 7, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शिक्षक, पदवीधर मतदार नोंदणीचा आज शेवट दिवस; जास्तीत-जास्त नोंदणी करून घेण्याचे तहसीलदार मदन जाधव यांचे आवाहन

November 6, 2025
नागरिकांच्या आग्रहास्तव रेखा प्रकाश खंदारे उमेदवारी अर्ज दाखल करणार; प्रभाग क्रमांक ३ मध्ये रंगणार हाय व्होल्टेज लढत; पतीची सामाजिक बांधिलकी पत्नीच्या कामी येणार

नागरिकांच्या आग्रहास्तव रेखा प्रकाश खंदारे उमेदवारी अर्ज दाखल करणार; प्रभाग क्रमांक ३ मध्ये रंगणार हाय व्होल्टेज लढत; पतीची सामाजिक बांधिलकी पत्नीच्या कामी येणार

November 6, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..