मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथे दोघांनी रात्री घरात प्रवेश करुन काठीने हातावर व पाठीवर मारुन एका महिलेच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीचे
सोन्याचे मंगळसुत्र व रोख 5 हजार रुपये घेवून गेल्या प्रकरणी रतन सिध्देश्वर भुसे, मंगेश सिध्देश्वर भुसे या पती-पत्नी विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी स्वप्नाली बाबासाहेब माने (वय 28, रा.मारापूर) या दि.9 रोजी रात्री 10.30 वाजता राहते घरात
फिर्यादी व त्यांचा मुलगा विराज व मुलगी पौर्णिमा असे घरात झोपले असताना घराची कडी वाजविल्याने फिर्यादीने दरवाजा उघडला असता
वरील आरोपीने घरात येवून काठीने फिर्यादीच्या हातावर व पाठीवर मारुन केस धरुन जमिनीवर खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादीच्या गळ्यातील 1 तोळ्याचे 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र ओढून घेवून निघून गेले.
तसेच जाताना भांड्याच्या कपटावर ठेवलेले रोख 5 हजार रुपये नेले. तू पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली तर बघून घेण्याची धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज