टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
त्यांच्या उपोषणाकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करत सोलापूरमधील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापूरमध्ये होणारा ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे.
‘मनोज जरांगे पाटील हे प्राणपणाने सहाव्यांदा उपोषणाला बसले असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेत असेल तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू.
आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जर निर्लज्ज मनाने सरकार लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेत असेल तर हे योग्य नाही.’, असे मत माऊली पवार यांनी व्यक्त केले.
२५ सप्टेंबर रोजी सोलापूरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हजेरी लावणार आहे.
हा कार्यक्रम होण्यापूर्वीच सकल मराठा समाजाने त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. अशात आता ओबीसी आंदोलकांनी गणिमी काव्यानं अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु केले आहे. या दोनही उपोषणला भेट देण्यासाठी गर्दी होणार आहे.
त्यामुळं कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणारा म्हणजे अंतरवाली फाट्यावर बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज