मंगळवेढा टाइम्स न्युज।
ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये दर महिन्याला जमा करण्यात येतात.
ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत. महिला वर्गामध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय आहे. मात्र अशा देखील काही महिला आहेत, ज्या या या योजनेसाठी पात्र नसताना देखील योजनेचा लाभ घेत आहेत.

अशा महिलांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांची नावं योजनेतून वगळण्यासाठी सरकारने आता या योजनेसाठी ई-केवायसी सुरू केली आहे. या योजनेचा लाभ पुढे चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे.

या योजनेसाठी सुरुवातीला केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर होती. मात्र अनेक लाभार्थी महिलांची ई केवायसी बाकी असल्यानं सरकारने केवायसीला मुदतवाढ दिली होती.

सरकारकडून ई केवायसीला 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. आता ई केवायसी करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. मात्र समोर येत असल्येल्या माहितीनुसार यावेळी सरकार केवायसीची मुदत वाढून देण्याची शक्यता फारच कमी आहे.

दरम्यान या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक महिलांची केवायसी अजूनही बाकी आहे, आणि आता या योजनेसाठी केवायसी करण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या महिलांची केवायसी वेळेत पूर्ण होणार नाही, त्यांना सन्मान निधी वितरण बंद होऊ शकते,

तसेच सरकारकडून देखील या योजनेची केवायसीची मुदत वाढून मिळण्याची शक्यता नाहीये, त्यामुळे लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
‘लाडक्या बहिणींनो… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !’ असं ट्विट तटकरे यांनी केलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














