टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर श्री.संत दामाजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या खटावकर मॉलला सकाळी ८ वाजता लागलेल्या आगीत जवळपास इमारत व विविध साहित्यासह ७ कोटी ६० लाख जळून खाक झाल्याची नोंद पोलीसात झाली आहे. दरम्यान मंगळवेढ्याच्या इतिहासातील आगीची ही मोठी दुर्घटना असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
या घटनेची हकीकत अशी, पंढरपूर मार्गावर असलेला खटावकर मॉल हा एप्रिल २०१९ मध्ये उभारण्यात आला होता. तालुक्यातील सर्वात मोठा मॉल म्हणून तो ओळखला जात असल्याने ग्राहकांची तेथे अधिक पसंती होत्याचे नव्हते झाले. दि. ८ रोजी धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच आग विझविण्याचे प्रयत्न केले.
वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने आगीचा भडका होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधीत मालकाने आग विझविणेकरिता मित्र रहिमतुल्ला (बबलू) काशिम सुतार यांच्या मदतीने मंगळवेढा नगरपरिषद, पंढरपूर नगरपरिषद, पांडुरंग साखर कारखाना,
विठ्ठल साखर साखर कारखाना, कारखाना, सोलापूर महानगरपालिका, सांगोला नगरपरिषद अशा सात विविध ठिकाणाहून अग्निशामक बंब बोलावण्यात येवून सकाळी ८ ते सायंकाळ पर्यंत पाण्याचा वर्षाव करुन आग आटोक्यात आणण्यात आली.
आगीच्या घटनेचे व्हिडीओ व्हॉटसअपवर फिरल्याने लोकांनी घटनेचे दृश्य पाहण्यासाठी भाऊ गर्दी केली होती. ही गर्दी आवरणे पोलीसांना मुश्किल बनले होते. परिणामी मंगळवेढा व्यतिरीक्त सांगोल्याहूनही पोलीस बल मागविण्यात आले होते.
मॉल मध्ये तेलाचे डबे, चपला, कपडे अशा वस्तू असल्यामुळे आग विझण्याऐवजी ती तब्बल ९ तास धुमसत राहिली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. मॉलच्या लगत काही कुटूंबे रहावयास असल्याने आगीचे दृश्य पाहून ती कुटूंबे भयभीत झाली होती.
महिला पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी या घटनेची खबरदारी घेवून स्वतः जातीने इमारतीवर चढून घरांकडे आग जाणार नाही याची दक्षता घेत बंबाच्या सहाय्याने पाणी मारुन ती आग आटोक्यात आणण्याचा विशेष प्रयत्न केला.
तसेच पुढील बाजूस डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड, प्रांताधिकारी बी. आर. माळी, तहसिलदार मदन जाधव, न.पा. प्रशासन अधिकारी विनायक साळुंखे आदींनी समोरील बाजूस अतिदक्ष राहून समोर जळीताचा धोका होणार नाही याची गांभीर्यपूर्वक काळजी घेतली.
हा मॉल श्री संत दामाजी ग्रामपंचायत हद्दीत असल्याने सरपंच जमीर सुतार, सदस्य आण्णासो आसबे यांनीही स्वतः थांबून आग विझविण्यास मदत केली. त्याच बरोबर पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासन, तरुण वर्ग, जेष्ठ नागरिक, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे ही या प्रसंगी धावून आले.
मंगळवेढ्याच्या इतिहासात एवढी मोठी पहिलीच दुर्घटना घडल्याने ते दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आल्याचे चित्र होते. मॉलच्या आगीचे दृश्य पाहून खटावकर कुटूंबीय यांच्याही डोळ्यात दुःखाश्रू उभे राहिले.
आग विझविण्याकामी खोमनाळ नाका परिसरात असलेल्या वठारे मळ्यातील बोअरचे पाणी अग्निशामक बंबात दिवसभर भरुन देण्यास त्यांनी मदत केली असल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत संगणक, फर्निचर, सी. सी.टी.व्ही. कॅमेरे, ए.सी.सोलर,
पॅकींग मशीन व इतर इमारतीमधील साहित्य असे २ कोटी ६० लाखाचे तर मॉल मध्ये विक्रीस आणलेले गृहपयोगी साहित्य ५ कोटी असे एकूण ७ कोटी ६० लाखाचे नुकसान अज्ञात कारणाने जळून झाले असल्याचे सुहास ताड यांनी दिलेल्या खबर मध्ये म्हंटलेले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसो पिंगळे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज