mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पावसाचा विजय! चेन्नई सुपर किंग्स-गुजरात टायटन्स फायनल स्थगित; ‘या’ दिवशी होणार लढत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 28, 2023
in मनोरंजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. सायंकाळी ६ वाजल्यापासून अहमदाबाद येथे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने अखेर ९ वाजता विश्रांती घेतली.

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज अंतिम सामना येथे खेळवला जाणार आहे. पण, चाहत्यांना खूपच वाट पाहावी लागत आहे. पावसाने १५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा हजेरी लावली.

पावसासोबत अहमदाबादमध्ये काही भागात गाराही पडल्या. मुसळधार पावसामुळे अखेर आज होणारा सामना स्थगित केला गेला अन् उद्या ही फायनल सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

९ वाजता थांबला, परंतु १५ मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा धो-धो पाऊस सुरू झाला आहे. अम्पायर्स मैदानाची पाहणी करत असताना पावसाची पुन्हा एन्ट्री झाली. पाऊस थांबण्याचं नाव घेत नसल्याने अखेर आजची मॅच उद्या खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

दोन्ही संघांनी ५-५ षटकांचा सामना खेळण्यास नकार दिला. किमान १०-१० षटकं त्यांना खेळायची होती, परंतु परिस्थिती पाहता ते शक्य नसल्याने आजचा सामना स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

अम्पायर रॉड टकर यांनी दिलेल्या माहितीनुसार १२.०६ पर्यंत सामना होऊ शकला असता, परंतु त्यासाठी किमान एक तास आधी पाऊस थांबावला हवा होता. पण, ११ नंतरही पाऊस सुरू राहिल्याने हा निर्णय घेतला गेला.

राखीव दिवस असणार?

दरम्यान हे लक्षात घ्या की आयपीएल 2022 मध्ये अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस होता, अशातच यंदाही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. अंतिम सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होणार असून जर

या वेळेत पाऊस पडला तर 09.35 पर्यंत खेळ सुरू झाल्यास षटकांमध्ये कोणतीही घट होणार नाही. तसेच यानंतरही, जर हवामानाने फटका दिला तर 5-5 षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ वेळ 11.56 पर्यंत असणार आहे.

एकही चेंडू न टाकल्यास काय होईल?

आज कमीत कमी पाच षटकांचा सामना खेळला गेला नाही, तर सामना राखीव दिवशी म्हणजे 29 मे ला होणार आहे. समजा राखीव दिवसातही निर्णय झाला नाही, तर गुजरात टायटन्सचा संघ विजेतेपद पटकावणार होता.

कारण गुजरात टायटन्सने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले असून चेन्नई सुपर किंग्सने दुसरे स्थान पटकावले आहे. अशातच एकीकडे गुजरातने 14 पैकी 10 सामने जिंकले आणि 20 गुण मिळवले तसेच त्यांचा 0.809 चा नेट-रन रेट होता. तर दुसरीकडे, सीएसकेने 14 पैकी 8 सामने जिंकले होते आणि त्यांचे 17 गुण होते.

हे प्लेऑफचे नियम

आयपीएल खेळण्याच्या परिस्थितीनुसार, फायनल, एलिमिनेटर, क्वालिफायर-1, क्वालिफायर-2 सामना टाय राहिला तर आणि निकाल लागला नाही तर हे नियम लागू होणार आहेत.

16.11.1: अंतिम फेरीतील विजेता ठरवण्यासाठी संघ सुपर ओव्हरमध्ये एकमेकांशी खेळतील

16.11.2: सामन्यात सुपर ओव्हर शक्य नसेल, आयपीएलच्या खेळण्याच्या परिस्थितीच्या परिशिष्ट एफ अंतर्गत विजेता निश्चित करण्यात येणार आहे. परिशिष्ट एफ नुसार, लीग टप्प्यात गुणतालिकेत जो संघ अव्वल असतो तो विजेता घोषित करण्यात येतो.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आयपीएल 2023

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

‘बहिणीच्या नावावरील प्रॉपर्टीला स्टॅम्प ड्युटी नाही, प्रस्ताव विचाराधीन’; मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा

October 24, 2025
आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

October 23, 2025
आज काही राशींवर लक्ष्मीची कृपा होऊ शकते; मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Lakshmi Puja : आज दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस; लक्ष्मीपूजनाची अचूक वेळ आणि ‘या’ राशींसाठी शुभ संकेत

October 21, 2025
काय सांगताय! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदीवर 7 हजारांची रेंजर सायकल डायरेक्ट फ्री म्हणजे इकदम फ्री!! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी पाडवा निमित्त खास धमाकेदार ऑफर

काय सांगताय! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदीवर 7 हजारांची रेंजर सायकल डायरेक्ट फ्री म्हणजे इकदम फ्री!! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी पाडवा निमित्त खास धमाकेदार ऑफर

October 24, 2025
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

दिवाळी नंतरही दिवाळी! ‘शीतल कलेक्शन’ मध्ये भव्य “स्वर्णिका साडी महोत्सव” साड्यांवर आकर्षक सवलती आणि मोफत मोत्याच्या दागिन्यांची ऑफर ग्राहकांच्या आग्रहास्तव अजूनही सुरूच

October 24, 2025
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळ! मंगळवेढ्यात मंदिरातील दानपेटी फोडणारा चोर रंगेहात पकडला; भक्त व गावकऱ्यांच्या तत्परतेने चोरीचा प्रयत्न फसला

October 7, 2025
कांतारा देखावा पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी झालेल्या मंडळाकडून यंदा महिषासुर जंगल व वधाचा देखावा; मिरवणुकीसाठी ‘हे’ आकर्षण राहणार

कांतारा देखावा पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी झालेल्या मंडळाकडून यंदा महिषासुर जंगल व वधाचा देखावा; मिरवणुकीसाठी ‘हे’ आकर्षण राहणार

September 23, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

नवरात्र उत्सवात डॉल्बी, डि.जे. व लेझर लाईट वापरास सोलापूर जिल्ह्यात प्रतिबंध; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश

September 22, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

दीदी झाली लखपती! लाडक्या बहिणींना बिनव्याजी ‘इतक्या’ लाखांचे कर्ज देणार; 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गणित

September 18, 2025
Next Post
प्रांताधिकारी यांची कसून चौकशी सुरू, लाचखोर नळे प्रकरण गाजनार; अँटी करप्शन अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाचे पुरावे? मोठा मासा गळाला लागणार

खळबळजनक! मंगळवेढ्यातील तरुणाची  चिट्टी लिहून आत्महत्या; मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीघांविरूध्द गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025

खळबळ! अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील भाच्या विरुध्द गुन्हा दाखल

October 26, 2025
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

October 25, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

October 25, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह दोघांचा मृत्यू; मृतामध्ये संगणक अभियंत्याचा समावेश

October 25, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 25, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा