मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील एका गावातील शाळेत शिक्षक नसल्यामुळे खुद्द महिला सरपंच यांना शिकवण्याची वेळ आली आहे.
सलगर खु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना शिक्षण खाते या शिक्षक मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे चक्क सरपंचाला शिक्षकाची भूमिका वटवावी लागली.
सलगर खु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी इतके वर्ग असून या वर्गामध्ये जवळपास 70 विद्यार्थी शिकत असून, चार शिक्षकांच्या आवश्यकता असताना एक शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत.
जून महिन्यापासून या ठिकाणी शिक्षक द्यावा, अशी मागणी येथील महिला सरपंच आरती कांबळे यांनी केली. परंतु शिक्षण खात्याने या मागणीकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्षित केले.
आ. समाधान आवताडे यांच्या गाव भेट दौऱ्यात आपल्यावर अंगलट येऊ नये या दृष्टीने शिक्षण खात्याने फक्त गावभेट दौऱ्या दिवशी एक शिक्षक तात्पुरते स्वरूपात या शाळेवर पाठवण्यात आला.
मात्र, दुसऱ्या दिवशी तो ही शिक्षक आला नाही. त्यामुळे तीन शिक्षकांशी गरज असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरपंचाला आता शिकवण्याची जबाबदारी पार पाडण्याची दुर्देवी वेळ तालुक्यामध्ये आली आहे.
तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षकासह प्रमुख अधिकाऱ्याची जवळपास 148 पदे रिक्त आहेत. या मागणीकडे शिक्षण खात्याने सोयीस्कर त्या दुर्लक्ष केले आहे.
आ. समाधान आवताडे यांच्या गाव भेट दौऱ्यात देखील शिक्षकांची शिक्षक मागणी मोठ्या प्रमाणात झाल्यावर आ. आवताडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक रिक्त ठेवून खाजगी शाळा चालवण्याची भूमिका बजावत असल्याचा आरोप करून खडे बोल सुनावले होते. तरी देखील शिक्षण विभागाने या शिक्षकांच्या रिक्त भरतीकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले आहे.
पहिली ते चौथीपर्यंत एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक होणारी नुकसान बघवेना म्हणून गेले दहा दिवसापासून लोकांनी मला विकासाच्या दृष्टीने सरपंच केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करून मी स्वतः शिकवण्याचे काम करीत आहे. आमदार येण्याच्या दिवशी शिक्षक पाठवून आमचे डोळे पुसण्याचा प्रयत्न केला तो शिक्षक कोण आहे याचे हे देखील पाहता आले नाही. – आरती कांबळे, सरपंच, सलगर खुर्द.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज