टीम मंगळवेढा टाईम्स सोलापूर ।
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी तसेच शेतकऱ्यांना विषारी औषधांपासून होणारा धोका टाळावा, तसेच शेती पिकांवर आलेले संकट कमी करण्यासाठी आणि औषधाची बचत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी अनुदान ड्रोन देण्याची योजना जाहीर केली आहे.
यामध्ये कृषी पदवीधर शेतकरी, बचत गटाच्या महिला आणि सहकारी संस्थांना जवळपास ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे.

या योजनेतून शेतकऱ्यांसाठी ड्रोन खरेदीवर ४० ते ८० टक्के अनुदान दिले जाते. ही योजना प्रामुख्याने नमो ड्रोन दीदी, कस्टम हायरिंग सेंटर्सद्वारे राबविली जात आहे.

शेतीमध्ये फवारणीत अचूकता आणणे आणि मजुरांची टंचाई कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच विषारी औषधामुळे यापूर्वी शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. तोही कमी होणार आहे. तसेच वेळेचीही बचत होणार आहे.

या ठिकाणी करावा लागेल अर्ज
ड्रोन योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल किंवा कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा लागेल तसेच त्या सोबत आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक खाते पासबुक, पॅन कार्ड आणि ड्रोन प्रशिक्षण प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

फवारणी ड्रोन आणि नमो दीदी ड्रोन अशा दोन योजना आहेत. त्यापैकी काही तालुक्यातून अर्ज आले आहेत, तर आणखी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत.-शुक्राचार्य भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक
या योजनेतून असे मिळते अनुदान
वैयक्तिक शेतकरी ४०-५०% (कमाल ५ लाख).
सहकारी संस्था: ७५% पर्यंत (कमल ७.५ लाख)
नमो ड्रोन दीदी (महिला बचत गट): ३ ८०% पर्यंत (कमाल ८ लाख)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













