मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
नगरपालिका निवडणुकीत उतरणाऱ्या इच्छुकांना राज्य निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारी अर्ज ऑनलाईन करण्यास अडचणी येत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत होते. त्याचा परिणाम अर्ज दाखल होण्यावर झाला आहे.
मात्र सोमवारपर्यंतच (ता. १७) अर्ज दाखल करण्यास मुदत असून शेवटच्या दोन दिवसात यंत्रणेवर ताण येऊ शकतो याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने रविवारी देखील ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु ठेवण्याचा आदेश काढला आहे.

तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास अडचणी येत होत्या. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकात शासकीय सुट्टी दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे सांगितले होते.

मात्र अडचण लक्षात घेऊन रविवारीही कामकाज सुरु ठेवले आहे. त्यामुळे शनिवार, रविवार व सोमवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी काढला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या ऑनलाईन संगणक प्रणालीत येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि शेवटच्या क्षणी सर्व्हरवर येणारा प्रचंड भार लक्षात घेता, आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

आता दिनांक १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान, उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र ऑनलाइन तसेच पारंपारिक अशा दोन्ही पद्धतींनी सादर करता येणार आहेत.

सर्व्हरच्या ताणामुळे घेतला निर्णय
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता आणि तेव्हापासून उमेदवारी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते.

मात्र, अर्ज भरताना या संगणक प्रणालीत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. अर्ज सादर करण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
अशा परिस्थितीत, एकाच वेळी सर्व उमेदवारांचा ऑनलाईन प्रणालीवर भार येऊन ती ठप्प होण्याची शक्यता होती. यामुळे अनेक उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती.
उमेदवारांना समान संधीसाठी ‘ऑफलाईन’चा पर्याय
उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून, मा. राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार, आयोगाने आता नवीन निर्देश जारी केले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











