टीम मंगळवेढा टाईम्स।
वादा तोच, पण दादा नवा” या आशयाचे बॅनर पुण्यातील आंबेगाव तालुक्यात झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित दादांची जागा रोहित पवारांनी घेतली, असं दर्शवणारा हा फ्लेक्स पुणे- नाशिक महामार्गावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे समर्थक मयूर भालेरावांनी हा फ्लेक्स झळकवला आहे. यामुळं बरीच चर्चा मात्र रंगलेली आहे.
अजित दादांची जागा रोहित पवारांनी घेतली
रोहित पवारांच्या फोटोसह “वादा तोच, पण दादा नवा”हे फ्लेक्स झळकले आहेत. त्याच भागात आज शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि स्वतः रोहित पवार सुद्धा या सभेला उपस्थित असतील.
आजवर शरद पवारांचे मानसपुत्र मानले गेलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पराभव करण्यासाठी ही मोर्चेबांधणी सुरु आहे.
मंत्री दिलीप वळसे पाटील हे आजवर शरद पवारांचे मानसपुत्र मानले गेले. मात्र, आज त्याच वळसे पाटलांविरोधात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे.
आज थेट वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशारितीने वळसेंना पराभूत करण्यासाठी पवारांनी शड्डू ठोकले आहेत.
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळाल्यावर पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. पवार आंबेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी शरद पवार त्यांच्या मानसपुत्राचा कोणत्या शब्दात समाचार घेतात, याकडे केवळ मतदारसंघाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून असेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज