
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहरातील आणखी चार व्यक्तींचे काल रात्री उशिरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या आता 29 वर पोचली आहे. आणखी 192 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. The city of Pandharpur grew four corona
पंढरपूर शहरातील रोहिदास चौक येथील दोन, मंदिर परिसरातील एक आणि झेंडे गल्ली भागातील एक अशा चार व्यक्तींचे रिपोर्ट काल रात्री पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता शहर व तालुक्यातील रुग्णांची संख्या 49 झाली आहे.
त्यापैकी 21 रुग्ण बरे झाले असून 23 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी याविषयी माहिती दिली. आतापर्यंत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या 49 व्यक्तींमध्ये शहरातील
29, ग्रामीण भागातील 13 आणि इतर जिल्हे व तालुक्यातून आलेल्या सात व्यक्तींचा समावेश आहे.
उपचार सुरू असलेल्या 27 व्यक्तींमध्ये शहरातील 16, तालुक्याच्या ग्रामीण भागातील सहा आणि इतर तालुके व जिल्ह्यांमधील पाच व्यक्तींचा समावेश आहे. सध्या 172 लोकांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत शहर व तालुक्यातील 1023 व्यक्तींची तपासणी करण्यात आली, त्यापैकी
831 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून अद्याप 192 अहवाल प्रलंबित आहेत.
शहरातील रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. तथापि नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












