टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांचंच असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाचा निकाल शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या निकालानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह शरद पवार गटाला वापरता येणार नाही. नवीन नाव आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाला निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे.
नवीन नाव आणि चिन्ह याबाबत शरद पवार गटाला आज संध्याकाळपर्यंत कळवायचं आहे. शरद पवार गटाने आपलं नाव आणि चिन्ह ठरवलं असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे
काय असेल नाव आणि चिन्ह?
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘मी राष्ट्रवादी पार्टी’ हे नाव आणि ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह मिळावं अशी मागणी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात केली जाऊ शकते. शरद पवार गटाने चार चिन्ह निश्चित केल्याची देखील माहिती मिळत आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार असल्याचं ट्वीट निवडणूक आयोगाच्या निकालानंतर केलं आहे.
येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ३ नावे आणि ३ चिन्हे सादर करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला केल्या आहेत. आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ही नावे आणि चिन्ह सादर करावी लागणार आहे. आज दिलेल्या वेळेत नाव आणि चिन्हांची यादी शरद पवार गटाने सादर न केल्यास त्यांना अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.
निवडणूक आयोगाच्या निकालात काय म्हटलंय?
निवडणूक आयोगाने अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवारांनाच राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह वापरता येणार आहे. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज