टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी परिचारक गटाचे अर्ज स्वतंत्रपणे दाखल होणार आहेत.
इच्छुकांनी अर्ज दाखल करावेत, छाननीनंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडक कार्यकर्त्यांबरोबर बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, प्रशांत परिचारक यांच्या या भूमिकेमुळे आमदार समाधान आवताडे गटाचे टेन्शन वाढणार आहे.
परिचारक गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर दोघांच्या मतांत फटाफूट होऊन राष्ट्रवादी आणि समविचारीला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक युटोपियन कारखाना कार्यस्थळी घेण्यात आली.
यापूर्वी कार्यकर्त्यांनीही बैठक घेऊन त्याबाबतचा निर्णय प्रशांत परिचारकांवर सोपवला होता.
त्यानंतर कारखान्याचे संस्थापक कि. रा.मर्दा यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आजी-माजी आमदार एकत्र आल्यामुळे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा माध्यमांसह सभासदांमध्ये सुरु झाली होती.
दुसरी समविचारीच्या बैठकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार यांनीही परिचारकांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करावा.
मंगळवेढा तालुक्यातील कारखानदारी वाचवण्यासाठी लक्ष द्यावे, त्यामुळे कारखानदारी चालविणे व टिकवण्याच्या दृष्टीकोनातून परिचारकांची भूमिका महत्वाची मानली जावू लागली होती.
दरम्यान, युटोपियन कारखान्यावर झालेल्या बैठकीवेळी परिचारक यांनी मंगळवेढ्यातील समर्थकांचे दामाजी कारखाना निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याबाबतची भूमिका ऐकून घेतली.
कार्यकर्त्यांशी बोलताना परिचारक म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत साखर कारखानदारी चालविणे सोपे नाही, ते फार अडचणीचे झाले आहे. साखरेचे दर वारंवार कमी जास्त होतात.
कर्मचारी पगार, ऊस बिल वेळेवर देण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दामाजी कारखान्याबाबत पक्षीय राजकारण न आणता ही कारखानदारी टिकली पाहिजे, या कारखान्याने अनेकांचे संसार उभे केले आहेत, ते मोडता कामा नये, असे सांगत तूर्त अर्ज दाखल करा.
छानणीनंतर एकत्रितपणे बसून त्याबाबत भूमिका जाहीर करण्यात येईल, असे परिचारक यांनी सांगितले.
बैठकीसाठी दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, जयंत साळे, रामकृष्ण नागणे, युन्नुस शेख, शिवानंद पाटील, नंदकुमार हावनाळे, गौरीशंकर बुरकूल, बापूराया चौगुले, काशीनाथ पाटील, राजेंद्र पाटील,
नामदेव जानकर, राजू पाटील, कन्हैया हजारे, गोपाळ भगरे, नामदेव जानकर, बाळासाहेब चौगुले, बाबासाहेब पाटील, सिध्देश्वर कोकरे, कांतीलाल ताटे, उत्तम घोडके, भारत पाटील आदी उपस्थित होते. (स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज