मंगळवेढा टाईम्स न्युज ।
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट व 8 पंचायत समिती गणासाठी निवडणूक आयोगाकडून लागू केलेल्या

आदर्श आचारसंहितेचे सर्वच राजकीय पक्ष, पार्ष्या, युती, आघाडीने काटेकोरपणे पालन करून निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सहकार्य करावे.

आज शुक्रवारी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

२०२६ आदर्श प्रभावी तहसील मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कार्यालयात काल गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे आदीजन उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












