टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज गुरुवारी दुपारी ठिक १ वाजता कारखाना कार्यस्थळावर
कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी दिली.
सदरहु सभेमध्ये सभासदांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून ती क्षमापित करणे, मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा संस्थेच्या कामकाजाविषयी अहवाल स्विकारणे,
ताळेबंद व नफा-तोटा पत्रके स्विकारणे, त्यास मान्यता देणे, वैधानिक लेखापरिक्षक यांचेकडून आलेला लेखा परिक्षण अहवाल वाचून नोंद घेणे, मागील आर्थिक वर्ष २०२०-२१ चा संचालक मंडळाने सादर केलेला
दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे व त्यास मान्यता देणे, अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या जमाखर्चास मंजूरी देणे, पुढील वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे,
पुढील आर्थिक वर्षाकरिता लेखापरिक्षक व आवश्यकतेनुसार इतर सल्लागारांच्या नेमणूका करणे, कारखान्याचे पोटनियमात दुरुस्ती करणे, डिस्टीलरी प्रकल्प कार्यान्वित करणेसाठी सद्यस्थितीबाबत विचार करणे,
तसेच अध्यक्ष यांचे पूर्व परवानगीने सभासदांनी विचारलेले प्रश्न व धोरणात्मक सुचनांचा विचार करणे इत्यादी विषयांवर या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विचार-विनीमय होणार आहे.
तरी आज संपन्न होणा-या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हा. चेअरमन तानाजी खरात यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज