टीम मंगळवेढा टाईम्स।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचे भव्य स्मारक होत आहे, त्यासाठी मोठा निधी देखील देण्यात आला आहे.
पण, महाविकास आघाडी सरकारने नेमलेली स्मारक समिती आता शिंदे फडणवीस सरकारने रद्द केली आहे. त्याठिकाणी नवीन सदस्यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातून बापूसाहेब मेटकरी यांचा समावेश झाला आहे.
माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह भाजप व शिंदे गटाच्या सर्वाधिक समर्थकांचा त्या समितीमध्ये भरणा असल्याचे दिसून येते.
सद्यस्थितीत विद्यापीठाच्या कोंडी (ता. उत्तर सोलापूर) या परिसरात मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे मोठे स्मारक उभारले जात आहे.
स्मारक उभारणी करण्यासंदर्भात लोकप्रनिधींकडून तसेच जिल्ह्यातील स्थानिक सामाजिक संघटना आणि विविध घटकांकडून विद्यापीठाकडे मागणी होत होती. त्यामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात विद्यापीठ व सरकारच्या संयुक्त सहभागाने अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी २३ ऑगस्ट २०२१ रोजी स्मारक समिती नेमण्याचा निर्णय झाला.
नवीन स्मारक समितीत यांचा समावेश
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १७ जणांची स्मारक समिती असणार आहे. कुलगुरु या समितीच्या कार्याध्यक्षा, तर कुलसचिव समन्वयक असतील. सदस्यांमध्ये माजी आमदार नारायण पाटील, बापू हटकर, शिवाजी बंडगर,
डॉ. बाबासाहेब देशमुख, मोहन हळणकर, शिवदास बिडगर, शिवाजी कांबळे, सुभाष मस्के, समता गावडे-सोनटक्के, नागेश वाघमोडे, अमोघसिद्ध ऊर्फ अमोल कारंडे, शरणू हांडे, मंगळवेढ्याचे बापू मेटकरी, सोमेश क्षीरसागर यांचा समावेश करण्यात आला आहे.(स्रोत:सरकारनामा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज