टीम मंगळवेढा टाईम्स ।
दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक पुणे बोर्डाने जाहीर केले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घेत एका वर्गात 25 विद्यार्थीच बसतील अशी व्यवस्था केली जाणार आहे.
कोरोनामुळे यंदा सर्वप्रथम लेखी आणि त्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांचा एकाच दिवशी पेपर असल्यास एका बेंचवर दोन विद्यार्थी बसू नयेत म्हणून त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
28 फेब्रुवारी पर्यंत ऑफर सुरू : शिवजयंतीच्या निमित्ताने अमर इलेक्ट्रॉनिक्सची भन्नाट ऑफर! फक्त 19 रु.मध्ये खरेदीकरा कुलर, AC, फ्रीज, टीव्ही व मोबाईल आणि मिळवा 1900 रु किंवा 19 टक्केचा डिस्काउंट
त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्याबाबत लवकरच बोर्ड विद्यार्थ्यांना सूचना देईल.राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, सातारा, जळगाव, अमरावती, अकोला, नाशिक यासह अन्य काही जिल्ह्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे.
तत्पूर्वी, 23 नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोनाची भीती अजूनही पूर्णपणे दूर झालेली नाही. तसेच 25 टक्के अभ्यासक्रम कपात करुनही अद्याप 40 टक्केसुद्धा अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. या पार्श्वभूमीवर पुणे बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकावर 22 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
परंतु, वेळापत्रकात बदल होईल की नाही हे अद्याप अस्पष्टच आहे. दहावी- बारावीच्या परीक्षा एकाचवेळी होणार असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक शाळांमधील 20, 25, 30 बेंचची संख्या बोर्डाकडून मागविण्यात आली आहे.
एका बेंचवर एकच विद्यार्थी बसणार
दहावी- बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्गात 25 विद्यार्थी परीक्षा देतील, अशी सोय केली जाईल.
दोन्ही वर्गातील मुलांचा पेपर एकाच दिवशी आल्यास एकाच वर्गात विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, अशी व्यवस्था केली जाईल. एकाच बेंचवर दोन विद्यार्थी बसणार नाहीत.– दिनकर पाटील,प्रभारी अध्यक्ष, पुणे बोर्ड, पुणे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज