मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सांगोला शहरातील खारवटवाडी येथील कॅनॉलशेजारी तीन पानी जुगार खेळणाऱ्या १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन एक लाख नऊ हजार २०० रुपये रोख व जुगार साहित्य जप्त केले.यात मंगळवेढा तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
सांगोला शहरातील खारवटवाडी येथील कॅनॉलच्या बाजूस काही जण विनापरवाना जुगार खेळत असल्याची माहिती सांगोला पोलिसांना मिळाली.
या माहितीनुसार पोलिसांनी काल सायंकाळी सहाच्या सुमारास छापा टाकला. त्या ठिकाणी विकास बाबासाहेब बेंद्रे (रा.बठाण ,ता.मंगळवेढा), रवी राजू मिसाळ (रा.कडलास रस्ता,सांगोला),रविराज दिलीप मस्के (रा.मस्के कॉलनी,सांगोला),दत्तात्रय यशवंत इंगवले (रा.देशपांडे गल्ली,सांगोला),प्रशांत धनवजीर (रा.भीमनगर, सांगोला), संतोष दिगंबर चांडोले (रा.चांडोलेवाडी,सांगोला),भाग्यवंत किसन पवळ (रा.चिंचोली,ता.सांगोला),शिवाजी बळीराम पवार (रा.पुजारवाडी,सांगोला),सूरज किशोर नाकील (रा.देशपांडे गल्ली,सांगोला),संजय शिवाजी घाडगे (रा.चिंचोली,ता.सांगोला) या १० जणांना तीन पानी जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
जाहिरात
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज