बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला तालुक्यातील हंगीरंगे येथील कोळसे ओढयातून विनापरवाना वाळू उपसा करून वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. ही कारवाई ९ ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आली असून याप्रकरणी दोघांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगोला पोलीस ठाण्याचे पोना संजय चंदनशिवे , पोना भोसले , पोकॉ कांबळे , होमगार्ड नलवडे हे पोलीस निरीक्षक गवळी यांच्या आदेशानुसार घेरडी हद्दीत पेट्रेलिंग करीत होते. घेरडी ते गावडेवाडी रोडवर गावातील पाण्याच्या टाकीजवळ समोरुन एमएच ११ एफ ५२५६ या क्रमांकाचा टेम्पो चोरुन वाळु भरून घेऊन येत असताना दिसला. पोलिसांनी त्यास थांबवून वाळूच्या रॉयल्टी पावतीबाबत विचारले असता त्याने पावती नसल्याचे सांगत सदरची वाळू कोळसे ओढा हंगीरंगे येथुन आणल्याचे सांगितले.
टम्पो चालकाने त्याचे नाव सुनिल अंबादास कोळसे रा हंगीरंगे ता.सांगोला व शेजारी बसलेल्याने रामदास भिवा बोरकर रा. गावडेवाडी ता.सांगोला असे असल्याचे सांगितले. टम्पोच्या हौद्यात बसलेले दोन इसम पळुन गेले असून त्यांची नावे अंकुश अंबादास कोळसे रा.हंगीरगे व लक्ष्मण भिवा बोरकर रा. गावडेवाडी असे आसल्याचे सांगीतले.
पोलिसांनी टेम्पो व एक ब्रास वाळू असा १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोना संजय चंदनशिवे यांनी वरील चौघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Tempo caught transporting sand in Sangola, charges filed against four
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज