टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची दुपारी दरम्यान निर्गुणरित्या हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
एकाच घरातील तीन महिलांच्या खून सत्रामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरात दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून
दिपाली बाळू माळी (वय-25), संगीता महादेव माळी (वय-50), पाराबाई बाबाजी माळी (वय-45) या तीन महिलांचा राहत्या घरासमोर हत्याराच्या सहायाने खून करण्यात आला. तिन्ही महिलाची प्रेते घरासमोर अत्यावस्थ पडली होती.
या घटनेने नंदेश्वरात खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी दाखल झाले. हत्येच्या कारणामागील शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.
या तीन महिलाच्या खुनामुळे नंदेश्वर गावावर शोककळा पसरली असून, अचानक झालेल्या खून सत्रामुळे गावात भितीचे वातावरण पसरले.
त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत एका संशयितास ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तपासाअंती या खुणाचे कारण स्पष्ट होणार आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज