टीम मंगळवेढा टाईम्स ।
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. सध्या उमेदवारी मिळालेल्या मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार सुरू आहे.
पण, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, अनुदानित, अशंतः अनुदानित शाळांवरील शिक्षकांना कोणत्याही राजकीय पक्षांच्या प्रचारात सहभागी होता येणार नाही.
त्यासंबंधीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी होऊन संबंधितावर वेतनवाढ, पदोन्नती रोखणे किंवा बडतर्फीची देखील कारवाई होवू शकते.
सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होणार आहे. १२ ते १९ एप्रिल या काळात उमेदवारांना निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर २० एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून २२ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २२ एप्रिल ते ५ मेपर्यंत प्रचाराचे दिवस असतील. ७ मे रोजी मतदान होणार आहे.
या दरम्यान, सरकारी पगार घेणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा उमेदवारांचा प्रचार करता येणार नाही आणि त्यांचा प्रचारात कृतीयुक्त सहभाग देखील असू नये, असे निर्बंध आहेत.(स्रोत:सकाळ)
संबंधितांवर बडतर्फीची देखील कारवाई होऊ शकते
जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक, खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना राजकीय प्रचारात सहभागी होता येत नाही. तरीदेखील नियम डावलून प्रचारात सहभागी झालेल्या शिक्षकांबद्दल कोणी तक्रार केल्यास त्याची चौकशी होते.
चौकशी समितीचा अहवाल, त्या शिक्षकाचा सहभाग, स्वरूप पडताळून संबंधितांवर बडतर्फीची देखील कारवाई होऊ शकते. – • कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज