टीम मंगळवेढा टाइम्स ।
किरकोळ कारणावरून भरशाळेत सहशिक्षकाने मुख्याध्यापकास लोखंडी पाइपने मारहाण केली. ही घटना जिल्हा परिषद शाळा, कुंभारी (ता. द. सोलापूर) येथे घडली.
सुभाष चंद्रन बसाप्पा पाटील (५८, रा. बोरामणी, ता.द. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश विठ्ठल क्षीरसागर (३५, रा. सोलापूर) याच्याविरोधात वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुभाष पाटील हे नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद शाळा, कुंभारी येथे आले.
त्यानंतर कार्यालयात बसून कामकाज करीत असताना महेश क्षीरसागर याने सुभाष पाटील यांना मला रजेचे रजिस्टर दे, रजिस्टर कोठे ठेवले आहे, असे विचारल्यावर कपाटातून रजेचे रजिस्टर काढून देत असताना
महेश क्षीरसागर याने मी सांगेल तेच काम कर नाही तर तुला बघून घेईन व येथील आधीचे सर्व मुख्याध्यापक माझ्या सांगण्याप्रमाणे काम करीत होते, अशी धमकी देऊन मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
मदतीसाठी ग्रामस्थ..
मुख्याध्यापक व सहशिक्षकांमध्ये सुरु असलेला वाद ग्रामस्थांना ऐकू आला. त्यानंतर गावातील नागनाथ पुजारी, विक्रम मोरे, गजानन होनराव यांनी शाळेत येऊन शिक्षकांमध्ये सुरु असलेला वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती केंद्रप्रमुख कुंदा राजगुरु यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रुग्णालयात उपचार..
मुख्याध्यापक सुभाष पाटील यांना लोखंडी पाइपने मारहाण केली. याशिवाय खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने सुभाष पाटील यांना कपाळ, कानाजवळ मुकामार लागला होता. उपचारासाठी पाटील हे शासकीय रुग्णालयात दाखल झाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज