mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रवादी पुन्हा! शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 21, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. कारण, गेल्या काही दिवसांतील गाठीभेटी अन् वाढत चाललेली जवळीक सध्या लक्षवेधी ठरत आहे.

त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे आणि रोहित पाटील यांनी अजित पवारांच्या घेतलेल्या भेटी चर्चेत आहेत. तर, आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवारांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केलंय.

विशेष म्हणजे या भेटीदरम्याच्या फोटोमधील काका-पुतण्याची देहबोली आणि चेहऱ्यावरील हास्य देखील सध्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या वाढदिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, ही केवळ सदिच्छा व वाढदिवस निमित्ताने असलेली भेट होती, असे सांगण्यात आले. पण, त्यानंतरही आमदारांच्या भेटींचा सिलसिला सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी असलेल्या रोहित पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची नागपूर येथे भेट घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा अखंड राष्ट्रवादीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षातील खासदारांच्या पार पडलेल्या बैठकीनंतरही अशी चर्चा सुरू झाल्याचे समजते. कारण, या बैठकीत खासदारांच्या मागे आगामी काळात तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठी लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

तसेच, पुढील काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुका या मुद्द्यांवर चर्चा पार पडली. त्यामध्ये अजित पवारांसोबत जाण्याबाबत काहीजणांनी इच्छा व्यक्त केली, तर काहींनी महायुतीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे.

खासदारांचा बैठकीनंतर पराभूत आणि विजयी आमदारांच्या बैठकीत देखील राष्ट्रवादी एकत्रित होण्याबाबत चर्चा पार पडली आणि याठिकाणी देखील 2 गट पाहायला मिळाले. मात्र, शरद पवारांनी या बैठका झाल्यानंतर कुठलीच प्रतिक्रिया दिली नसल्याचे दिसून आले.

पक्षातील नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची आणि शरद पवार यांची भेट झाल्याची बाब समोर आली. त्यातच, शरद पवारांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांनी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा अखंड राष्ट्रवादी होणार अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

अदानींच्या निवासस्थानी भेट

एकीकडे अजित पवार शरद पवार यांची भेट होतं असताना त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट झाल्याचे समोर आले. त्यामुळे, शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत जाण्याऐवजी भाजपसोबत जाण्याचा मार्ग निवडतील का, अशी देखील चर्चा सुरू झाली. कारण केंद्रात एनडीए सरकार मजबूत करायचं असेल तर मोदींना आणखी खासदारांची गरज लागणार आहे, आणि सध्या शरद पवारांकडे 8 खासदार आहेत.

मुख्य प्रतोदांनी घेतली अजित पवारांची भेट

शरद पवारांची अमित शाह यांच्यासोबतची भेट आणि त्यानंतर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांची वाढलेली जवळीकता पाहता अखंड राष्ट्रवादीची चर्चा जोर धरू लागली. दरम्यान, शरद पवारांच्या दोन्ही मुख्य प्रतोद यांनी विविध कारणास्तव अजित पवारांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे.

सध्या जरी रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि सलील देशमुख यांनी मतदारसंघातील अडचणीबाबत अजित पवारांसोबत भेटीगाठी होतं असल्याचं म्हंटलं असलं तरी आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्रित येत असल्याचं पाहायला मिळाल्यास त्याची पायाभरणी ही विधानपरिषद, विधानसभा प्रतोद यांच्या होत असलेल्या भेटीगाठीत असेल यात शंका नाही.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 7588214814

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 7588214814 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राष्ट्रवादी शरद पवार गट

संबंधित बातम्या

चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 2, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
Next Post
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

संतापजनक! विद्यार्थ्यांना खाऊ घातल्या बळजबरीने मिरच्या; 'या' गावच्या शाळेतील शिक्षकाचा प्रताप

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा