टीम मंगळवेढा टाईम्स ।
बेरोजगार असल्याचा गैरफायदा उठवत दोघांनी मिळून तरुणाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट ऑफर लेटर देऊन त्याच्यासह त्याच्या मित्राकडून एकूण ५ लाख ९७ हजार रुपयांना
गंडवल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
महिबूब हसनसाब हेमुने (रा. मड्डी वस्ती, होटगी स्टेशनजवळ, सोलापूर), अकबर धवलजी शेख (रा. मित्र नगर, शेलगी, सोलापूर), अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी माधुरी संजय कोपरे यांनी फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, फिर्यादीचा मुलगा अक्षय याचा विश्वास संपादन करून नमूद दोघांनी त्याच्याकडून नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.
त्यानुसार एन.टी.पी.सी. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे सही, शिक्का असलेले बनावट आभार लेटर, ट्रेनिंग लेटर, नेमणुकीचे पत्र, ऑफर लेटर फिर्यादीचा मुलगा अक्षय याला दिले. या बदल्यात त्याच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये घेतले.
हा प्रकार २२ नोव्हेंबर २०२३ रोजी काडादी चाळ येथे घडला. याचबरोबर फिर्यादीच्या मुलगा अक्षय याचा मित्र अमोल शरणबसवेश्वर तारापूर याच्याकडूनही अशाच प्रकारे फसवणूक करून ४७,५०० रुपये घेतले.
प्रत्यक्षात नोकरी न लावता पैशाबद्दल पाठपुरावा करूनही आजतागायत परत केले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिसांनी भा.दं.वि. ४२० अन्वये गुन्हा नोंदवून घेतला आहे. पुढील तपास महिला सहा. पोलिस निरीक्षक कुदळे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज