टीम मंगळवेढा टाईम्स ।
एस.टी बस न मिळाल्याने मोटर सायकलस्वारास हात करून शिकवणीस जाणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा गैरफायदा घेत तीला ज्वारीच्या पिकात नेवून अत्याचार केल्याप्रकरणी
राजू चंद्रकांत राठोड (रा.बालाजीनगर) याला पोलिसांनी काही तासात सीसीटीव्ही फुटेज च्या साह्याने अटक करून अटक करून पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील अल्पवयीन पिडीत मुलगी ही दि.1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वा. शिकवणीसाठी मंगळवेढ्यात येण्यासाठी बस न आल्याने मुलीने तास चुकेल या भितीने सांगोल्याकडून मंगळवेढ्याकडे मोटर सायकलवर येणाऱ्या राजू राठोड यास हात करून मंगळवेढयात सोडण्याची विनंती केली.
आरोपीने शहरात नेण्याऐवजी बोराळे रोडवरील काळया शिवारात नेवून तीच्यावर जबरी अत्याचार करून पुन्हा त्या मुलीला शहरातील शाळेजवळ आणून सोडले.
सदर मुलीने ही घटना तीच्या शिक्षिकेला सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फूटली. पोलिसांनी पहाटेपर्यंत त्या आरोपीचा खबर्यामार्फत शोध घेतल्यानंतर या घटनेतील आरोपी बालाजीनगर येथील एक मजुर काम करणारा राजू राठोड असल्याची माहिती उघड झाली.
या शोधासाठी सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासण्यात येवून त्या आधारे संशयीत आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आरोपीच्या शोधासाठी विविध चार पथके तैनात करण्यात आली होती. या पथकाने पहाटे 4.00 वा. आरोपीला ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरिक्षक मनिषा महाडिक या करीत आहेत.
पोलिसांनी सुटकेचा निस्वास सोडला
मुलीला ज्या मोटर सायकलवरून नेले त्या मोटर सायकलवर पुढील बाजूस पोलिस व पाठीमागील नंबर प्लेटवर आई असे लिहिल्याने हा प्रकार पोलिसांनीच केला असल्याच्या संशयावरून मंगळवेढ्यात दिवसभर उलट सुलट चर्चा सुरू होत्या.
घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी विक्रांत गायकवाड, वेळापूरच्या महिला डी.वाय.एस.पी, सोलापूरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक या घटनेचा शोध घेण्यासाठी मंगळवेढयात दाखल झाले. चार पदके नेमून पोलिसांनी काही तासात सीसीटीव्ही फुटेचा आधार घेत आरोपीचा आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलिसांनी सुटकेचा निस्वास सोडला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज