mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुलांनो! आई-वडिलांना सांभाळा, अन्यथा वारसा नोंद रद्द होईल; मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा ठराव, प्रतिज्ञापत्रही लिहून घेणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 30, 2023
in मंगळवेढा, राज्य
मुलांनो! आई-वडिलांना सांभाळा, अन्यथा वारसा नोंद रद्द होईल; मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा ठराव, प्रतिज्ञापत्रही लिहून घेणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । समाधान फुगारे

आई-वडिलांना सांभाळा, त्यांची काळजी घ्या, अन्यथा वारसा नोंद रद्द करण्यात येईल, अशा पद्धतीचा निर्णय मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी नगर ग्रामपंचायतीने घेतला आहे.

शिवाय नवीन वारसा नोंद करताना देखील आई-वडिलांची काळजी घेईन, तसे न केल्यास कारवाईस पात्र राहिन, असे प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेतले जाणार आहे. इतकेच नाही तर वीज, पाणी या मूलभूत सुविधा देखील न पुरवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

संत दामाजीनगर ग्रामपंचायतीला सामाजिक सुधारणांची परंपरा आहे. या निर्णयामुळे चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या मुलांना चाप बसेल, उतार वयामध्ये कुणीही आपल्या आई-वडिलांना दूर करणार नाही, यासाठी या ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं ग्रामपंचायतीचं संपूर्ण जिल्हाभर कौतुक होत आहे.

खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सरपंच जमीर सुतार यांच्या अध्यक्षतेखाली संत दामाजी नगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज पार पडली.

या ग्रामसभेत आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची वारस नोंद न करण्याबाबत, सुविधा-लाभ देणेबाबतचा व जल जिवन योजने अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा साठी लागणाऱ्या विद्युतसाठी सौर ऊर्जा वापर करणेबाबतचा ठराव करण्यात आला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

तसेच संत दामाजीनगर मधील आंगनवाडी यांना कपाट, टेबल, खुर्ची, खेळनी साहित्य चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांच्या हस्ते वाटप करणेत आले.

याप्रसंगी सरपंच जमीर सुतार, ग्रा. पं सदस्य लक्ष्मण गायकवाड, अण्णासाहेब आसबे, संजय माळी, सोमनाथ शिंदे, नंदा ओमणे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव जावीर, पा.पु-स्व समिती अध्यक्ष दिलीप उगाडे,

संत चोखामेळा नगर ग्रा.पं.सदस्य विशाल जाधव, ग्रामविकास अधिकारी, कृषि व पशुसंवर्धन विभाग अधिकारी तसेच ग्रामस्थ विजय जावळे, उमेश ढगे, लक्ष्मण बाबर, ज्ञानेश्वर वाघमारे, वैभव खराडे, डॉ. तळ्ळे, शिवाजी भोसले सर, बबन माने सर, मोटे साहेब, शौकत मुलाणी, दीपक पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

काय आहे ठराव?

कौटुंबिक जीवनात आई-वडिलांना न सांभाळता त्याचीच वारस मुले मुली आपल्या स्वत:च्या जीवनात व्यस्त असतात. विशेष म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा उपभोग घेत असतात पण आई-वडिलांना मात्र घरातून बाहेर काढून किंवा विभक्त ठेवून म्हातारपणी त्यांच्या पालणपोषणाकडे पूर्णत: दुर्लक्ष करुन आजारपणातही आर्थिक जबाबदारी न घेता त्यांच्याची आपले जणून काही नातेच नाही अशाप्रकारे त्यांचे वारस आज सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपभोगतात,

परिणामी म्हातारपण हा शाप ठरला असून म्हातारपणातील वयात आईवडिलांना जगणे मात्र मुश्कील झाले आहे. त्यामुळे जो मुलगा अगर मुले आपल्या आई वडिलांनी सांभाळत नाहीत त्या मुलांना आई बापांच्या नावावरील संपत्तीचे वारस होता येणार नाही, जे मुले आणि मुली आई वडिलांना सांभाळतील त्यांनाच बापाच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे वारस म्हणून हक्क मिळावे, असे वारस नोंदीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल.

मी माझ्या आई-वडिलांचा सांभाळ करेन, मी त्यांना दवाखाना किंवा आरोग्याच्या बाबतीत इतरत्र कोणतीही कमतरता भासू देणार नाही, मी माझ्या कर्तव्याचे पालन करेन, माझ्याकडून या सर्व गोष्टीचे पालन झाले नाही अशी तक्रार आली किंवा शेजारच्यांकडून माहिती घेतल्यानंतर माझ्या कर्तव्यात कसूर झाल्याचं आढळल्यास ग्रामपंचायत दप्तरी असिसमेंटला लागलेले नाव तात्काळ कमी करण्यात यावं. माझ्या घरी असलेले नळ कनेक्शन कट करण्यात यावे. त्याबाबत मी कोणीही कोणतीही तक्रर करणार नाही असा मसुदा प्रतिज्ञापत्रात असेल.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संत दामाजी नगर ग्रामपंचायत

संबंधित बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 4, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
Next Post
मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

देवेंद्र फडणवीसांनी 'वजन' वापरलं?, अजित पवारांचा तो निर्णय मुख्यमंत्री शिंदेंनी 8 दिवसात फिरवला; नेमकं काय आहे प्रकरण?

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा