मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कमलापूर ( ता . सांगोला ) येथे शनिवार दि . २८ मार्च रोजी दुपारी घडली . सिद्धेश्वर एकनाथ पवार ( वय २१ ) रा . वाटंबरे असे त्याचे नाव आहे . वाटंबरे येथील पाच तरुण कमलापूर ( ता . सांगोला ) येथील शेततळ्यात दुपारी पोहायला गेले होते . सिद्धेश्वरने मला पोहायला येते , असे सांगून शेततळ्यात उडी मारली.
त्याला पोहता न आल्याने तो बुडू लागला . काही वेळानंतर इतर तरूणांनी त्याला वर काढले व उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच सिद्धेश्वरचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले . याबाबत पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज