मंगळवेढा टाईम्स टीम ।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आणि जीवनचरित्राचा जागर व्हावा यासाठी राज्य सरकारने शिव स्वराज्य दिन आज साजरा करण्याचे निश्चित केले आहे.
राज्यातील ३० हजार ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा प्रशासनाच्या सर्व प्रमुख कार्यालयांच्या ठिकाणी यादिवशी गुढी उभारली जाणार आहे.
गुढी समोर सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांनी नतमस्तक होऊन शिवरायांचे स्मरण करावे, महाराष्ट्र गीत, राष्ट्रगीत, शिवरायांचे विचार मांडावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातही हा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हा उत्सव साजरा करणार आहेत.
यानिमित्ताने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा ध्वज फडकावण्यात येणार आहे. यासाठी भगवा स्वराज्य ध्वज संहिता व शिवशक राजदंड स्वराज्य गुढी संहिता ठरविण्यात आली आहे.
उच्च प्रतीचे सॅटीन असलेला ३ फूट रुंद आणि ६ फूट लांब या प्रस्थापित प्रमाणात भगवा ध्वज असावा. ध्वज जिरोटोप , सुवर्णहोन , जगदंब तलवार, शिवमुद्रा , वाघनखे या छत्रपती शिवरायांच्या शुभचिन्हांनी अलंकृत असावा.
शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून ध्वज उभारणीसाठी १५ फूट उंचीचा वाशा किंवा बांबू असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कपड्याची गुंडाळी असावी.
राजदंड सरळ उभा करण्यासाठी किमान ५ ते ६ फुटांचा आधार द्यावा , अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ६ जून रोजी सकाळी ९ वा . शिवशक राजदंडावर भगवा स्वराज्य ध्वज बांधून घ्यावा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलशस्यतेच्या झोळीमध्ये रिता करून रयतेची झोळी सुख , समृद्धी , समता वस्वातंत्र्याने भरली म्हणून शिवशक राजदंडाच्यावर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा सुवर्ण कलश बांधावा.
त्यावर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी असे अष्टगंधाने लिहून अक्षता लावाव्यात. सुवर्ण कलशाभोवती पुष्पहार , गाठी , आंब्याच्या डहाळी बांधाव्यात. त्यानंतर शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सरळ उभी करावी.
त्यानंतर राष्ट्र व महाराष्ट्रगीत सादर करावे. सूर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्य गुढी खाली घ्यावी वभगवा ध्वज व्यवस्थित घडी करून जतन करावा असे नमूद केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज