टीम मंगळवेढा तमंगळवेढा तालुक्यात दक्षिण भागात अद्यापपर्यंत कोरोनाचा शिरकाव नव्हता , मात्र सोमवारी या दोन घटनांनी कोरोनाची एन्ट्री झाली आहे. सोड्डी येथील महिला ही कर्नाटक येथून आली आहे तर खवे येथील पुरुष मुंबई बेलापूर येथून आला आहे. दोन्ही व्यक्तींचे स्वॅब पुन्हा घेतले जाणार असून त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर याबाबत अधिकृतरित्या घोषणा करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले आहे.
मरवडे ता.मंगळवेढा येथे सोमवारी पुरुष व्यक्ती मुबंईहुन आला आहे. त्यांचेकडे खाजगी कोरोना चाचणी अहवाल असुन पॉझिटिव्ह आहे. म्हणुन त्यांना व त्यांचे निकट संपर्कात असलेला त्यांचा मुलगा या दोघाना मंगळवेढा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवणेत आले असुन त्यांचे उपचार करणेत येत आहेत.
तसेच सोडडी ता.मंगळवेढा येथे एक महीला कर्नाटक मधुन आली असुन तिच्याकडे इंडी कर्नाटक येथील कोरोना चाचणी अहवाल असुन तो पॉझिटिव्ह आहे. म्हणुन त्यांना व त्यांचे निकट संपर्कात असलेल्या व्यक्तींना मंगळवेढा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवणेत आले असुन त्यांचे उपचार करणेत येत आहेत.
वरील दोन्ही व्यक्तीचे स्वब पुन्हा आपलेकडे घेणार येणार असुन त्यांचे अहवाल प्राप्त झालेनंतर त्यांचे कोरोना चाचणी अहवालाबाबत आधिकृतरीत्या सांगणेत येईल.
आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
The swabs of ‘those’ two corona victims who came to Mars will be taken for re-examination
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज