मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वसान देत महायुती सरकार सत्तेत आले. मात्र अद्याप सरकारने बळीराजाची कर्जमाफीची मागणी पूर्ण केली नाहीये.
कर्जमाफी करण्यात यावी ही मागणी शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांनी वारंवार केलीय. पण त्याबाबत समिती नेमली जाणार मग घोषणा केली जाईल असं बतावणी करत मंत्री शेतकऱ्यांना चकवा देत आहेत. मात्र आता कर्जमाफी प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय.
महायुतीमधील मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केलीय. मुख्यमंत्री लवकरच राज्यातील बळीराजाची मागणी पूर्ण करणार आहेत, असे सुतोवाच मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
पुसद येथे एका पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विधान केलंय. यवतमाळच्या पुसद येथे हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी कृषी गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यातील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला मंत्री संजय राठोड हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विधान केलं.
कृषी गौरव पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना संजय राठोड म्हणाले, हा पुरस्कार नसून नव्या पिढीला दिलेला ठेवा आहे. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
पण संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरूय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील. महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख आहे. राज्याच्या प्रमुखांकडून लवकरच याची घोषणा केली जाईल.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही दिले संकेत
दरम्यान मंत्री राठोड यांच्याआधी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकरी कर्जमाफीबाबत भाष्य केलं होतं. मीही शेतकरी पुत्र आहे. शेतकऱ्याच्या घरात माझा जन्म झाला आहे.
सकाळी उठलो तरी मला शेती दिसते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहितीयेत. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील, असं कृषीमंत्री म्हणाले होते.
कर्जमाफीबाबत समितीकडून काम केलं जात आहे. योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समिती नेमण्यात आलीय, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवसापूर्वी दिली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज