टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील सुरेश रामचंद्र काळे याची अवैधरीत्या वाळू चोरून ट्रॅक्टर व ट्रॉली पोलिसांच्या ताब्यातून बळजबरीने घेऊन
स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता धमकावून पोलिसांवर दांडपट्ट्याने हवेत वार करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी
पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी. लंबे यांनी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला.
याप्रकरणी अटक होऊ नये म्हणून वकिलांमार्फत सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीवेळी वकिलांनी युक्तिवादात फिर्याद देण्यास झालेला विलंब, आरोपी हा संघटित गुन्हेगारी टोळीस मदत केल्याचा किंवा
सदरील आरोपीचा संघटित गुन्हेगारांच्या टोळीस सहभाग असल्याचा व तसेच त्याचा सातत्याने गुन्हेगारी करणाऱ्या टोळीत सहभाग घेऊन गुन्हा केला असा असल्याचा
कोणताही कागदोपत्री पुरावा आरोपी विरुध्द नाही, असे अनेक मुद्दे मांडले. ते ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने आरोपीची
५० हजार रुपयांच्या जाच मुचलक्यावर व इतर अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड.किरण सराटे, अॅड. नागेश देवकते सरकारतर्फे अॅड.सारंग वागीकर यांनी काम पाहिले.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज