टीम मंगळवेढा टाईम्स ।
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा रविवारी फिनाले झाला. या संपूर्ण सीजनमध्ये ग्रामीण भागातील सूरज चव्हाण यांने आपली छाप पाडली. रिल स्टार असलेल्या सूरज चव्हाण हा यापूर्वीच गावा गावात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचला होता.
परंतु बिग बॉस मराठीमुळे तो मराठी घरा घरापर्यंत पोहचला. 28 जुलै रोजी सुरु झालेला बिग बॉसमधील सूरज चव्हाण याचा यशस्वी प्रवास 70 दिवसांनी 6 ऑक्टोबर रोजी संपला. यानंतर सूरज चव्हाण याच्यावर बक्षिसांची खैरात झाली. सोबत त्याला चित्रपटात कमा करण्याची ऑफर मिळाली.
काय, काय मिळाले सूरजला
सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठीतील विजेत्यामुळे १४ लाख ६० हजार रुपये मिळाले. तसेच पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सकडून दहा लाख रुपये मिळाले. तसेच सूरज चव्हाण याला एक स्कूटर मिळाली. तसेच एका चित्रपटाची ऑफरसुद्धा मिळाली. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला चित्रपटाची ऑफर दिली.
हे होते स्पर्धेक
बिग बॉस 5 चा विजेतपदासाठी सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यामध्ये स्पर्धा होती. फिनाले दरम्यान, सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत टॉप 2 मध्ये राहिले.
अभिजीत सावंत हा एक सुप्रसिद्ध गायक आणि इंडियन आयडॉलचा पहिला विजेता होते. त्याला सूरजने मागे टाकून विजेतेपद मिळवले. अभिजित उपविजेता ठरला. अभिजीतने संपूर्ण सीझनमध्ये आपला करिष्मा दाखवला.
सूरज चव्हाण बारामती तालुक्यातील आहे. घरच्या परिस्थितीमुळे लोकांकडे 300 रुपये मुजरीवर सूरज चव्हाण जात होतो. परंतु त्याच्या नशिबात वेगळेच काही होते. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ केल. तो प्रचंड लोकप्रिय झाला. मग तो रिलस्टार झाला आहे.
आता इंस्टाग्राम प्रोमोशन आणि यूट्यूब हे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. तो अनेक ठिकाणी कार्यक्रमांच्या उदघाटन समारंभसाठी जात असतो. त्यासाठी तो 40-50 हजार रुपये मानधन घेतो. त्याला आता चित्रपटही मिळू लागले आहे. आज सर्व गोष्टीतून महिन्याला लाखो रुपये सूरज कमवत आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज