टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल कारखान्याकडे मागील हंगामातील उसाची बिले थकीत आहेत. सदर कारखान्यांवर आरआरसी ची कारवाई होऊन शेतकऱ्यांना ऊस बिल मिळावीत,
कोरोना व त्यानंतर आलेल्या विविध नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे.
कृषीपंपाची वीज बंद केल्यामुळे शेतातली पिके वाचू शकत नाही अशा दोन्ही बाजूने शेतकरी कचाट्यात सापडला आहे.
त्यामुळे तातडीने कारखान्याची साखर जप्त करून शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले द्यावी अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने तहसील सुशील बेल्हेकर यांच्याकडे केली.
विठ्ठल कारखान्याच्या आरआरसी च्या तीन नोटिसा झाल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठांची परवानगी घेऊन तात्काळ कारखान्याची साखर ताब्यात घेण्यात येईल आणि शेतकऱ्यांची बिले लवकरात लवकर देऊ असे अश्वासन बेल्हेकर यांनी स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाला दिले.
चालू वर्षी उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी महावितरणला फुल ना फुलाची पाकळी म्हणून पंढरपूर तालुक्यातून कोट्यावधी रुपयाची वीज बिल भरलेले असताना,
परत एकदा अडचणीतल्या शेतकऱ्यांना तगादा लावण्याचं काम महावितरण करत आहे.
येत्या चार ते पाच दिवसात शेतीपंपाची वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तहसील कार्यालयामार्फत आमच्या पिकाची पंचनामे करावे आणि नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष सचिन पाटील , शहाजहान शेख, अजित बोरकर , बाहुबली सावळे, सचिन आटकळे , आबा चव्हाण , साहिल आतार , योगेश शिंदे आदी उपस्थित होते.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज