mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आरोग्याची वारी! पंढरीनगरीत DVP मॅरेथॉनचे याही वर्षी यशस्वी आयोजन; खा.ओमराजे निंबाळकर प्रमुख आकर्षण म्हणून आले तेही धावपटूच्या सोबत धावले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 4, 2024
in मनोरंजन, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स । राजेंद्र फुगारे पंढरपूर

यशस्वी आयोजनाची परंपरा कायम राखत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि अबालवृद्धांच्या उस्फुर्त प्रतिसादात DVP पंढरपूर मॅरेथॉन संपन्न झाली. हजारो नागरिकांनी स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर, सुदृढ पंढरपूर हे ब्रीद घेऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

अगदी ६ वर्षांपासून ते साठी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवला. अनेक प्रतिथयश मान्यवर देखील यामध्ये सहभागी झाले होते. धाराशिवचे खासदार श्री.ओम राजेनिंबाळकर यांनी देखील २१ किमीचा टप्पा धावत पूर्ण करून ‘फिटनेस‘चे एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत केले.

खा.ओमराजे निंबाळकर, श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन  अभिजीत पाटील, डॉ. प्रशांत निकम, प्रांताधिकारी गजानन गुरव, विश्वंभर पाटील, डाॅ.बायगुडे, किरण घाडगे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते…

10 किलोमीटर गट ( ओपन गट)
अजित लवटे  (32 मिनिट 2 सेकंद )
अमोल नागणे (32 मिनिट 53 सेकंद)
निशांत सावंत( 33 मिनिट 25 सेकंद)

महिला गट-
आर्या काळेल ( 38मिनिट 38 सेकंद)
वैष्णवी सावंत (38 मिनिट 51 सेकंद)
योगिनी साळुंखे (39 मिनिट 37 सेकंद )

21 किलोमीटर ओपन पुरुष –
अंकुश हाके (2 तास 8 मिनिट 50 सेकंद )
विशाल कांबीरे (1 तास 9 मिनिट 25 सेकंद )

महिला गट
साक्षी जेडाल  (1 तास 20 मिनिट 6 सेकंद)
अर्चना जाधव ( 1 तास 23 मिनिट 8 सेकंद)
आकांक्षा शेलार ( 1 तास 24 मिनिट 8 सेकंद )

झुंबा डान्स सोबतच वारकरी बांधवांच्या पावलीने या उपक्रमात रंगत आणली.

हजारो वर्षांच्या वारकरी संप्रदायाची परंपरेचे केंद्र बिंदू असणाऱ्या आपल्या पंढरपूर मध्ये ही आधुनिक स्वरूपातील “आरोग्य वारी” अशीच अखंड सुरू राहो आणि या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप येऊन प्रत्येक पंढरपूर वासियाचे आरोग्य सुदृढ होवो हीच श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना..
………….

दर वर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेमधील सहभाग सातत्याने वाढताना दिसत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विशेषतः युवक काही महिने आधीपासून तयारी सुरू करतात. पहाटे अनेक युवकांचे युवतींचे ग्रुप आपण पंढरपूरमध्ये पाळताना पाहू शकतो. आता ही केवळ एक स्पर्धा राहिली नसून आरोग्याविषयी जन जागृतीचे अभियान झाले आहे.

आरोग्य – आजच्या भाषेत फिटनेस साठी ही स्पर्धा प्रेरणा आणि प्रोत्साहन तर देतेच पण मोठ्या शहरात होते त्याप्रमाणेच उत्कृष्ठ नियोजन  आपल्या पंढरपूर मध्ये देखील होऊ शकते, याचाही मापदंड सिद्ध करते.

सहभागी स्पर्धकांना अल्पोपाहार, टी शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी

इंजिनियर भारत बलभीम ढोबळे, सचिव बालाजी गणपत शिंदे, खजिनदार विश्वंभर गणपतराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. मंदार सुभाष सोनावणे , सहसचिव रेखा सतीश चंद्रराव , सहखजिनदार महेश शरदराव भोसले ,सदस्य डॉ.संजयकुमार ज्ञानदेव सरडे, डॉ. आशिष गोपालकृष्ण शहापूरे ,डॉ.चंद्रकांत बाळास मगर,

डॉ.संगिता शीतल पाटील, किरण शंकर घाडगे, भगवंत अनंतराव बहिरट, दिलीप पांडुरंग कोरके, गणेश औदुंबर बागल ,राजन बळीराम थोरात , जयलक्ष्मी संतोष माने ,माधुरी सुरेश माने यासह  रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डिव्हीपी

संबंधित बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

भयानक! वडिलांचे सहामहिन्यांपूर्वी निधन, जमीन नाही, स्वतःचे हक्काचे घर नव्हते, हलाखीच्या परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली १४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

July 12, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! खोट्या सोन्यावर तारण कर्ज घेण्याची मंगळवेढ्यासह तीन तालुक्यात साखळी, साेलापूर जिल्हा बँकेतील प्रकार, अनेकांवर होणार गुन्हे दाखल; ‘इतके’ शाखाधिकारी निलंबित

July 12, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

तीन सहकारी बँकांना आरबीआयकडून विविध कारणासाठी दंड; सोलापूर आणि…’या’ बँकेचा समावेश

July 11, 2025
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

आमदार अभिजीत पाटलांच्या विठ्ठल कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 10 लाखांची खंडणी; सामाजिक कार्यकर्त्याला अटक

July 11, 2025
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

July 9, 2025
अवघे गरजे पंढरपूर..! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा; विठ्ठलाच्या चरणी देवेंद्र फडणवीसांनी घातलं ‘हे’ महत्वपूर्ण साकडं

यंदाच्या आषाढी वारीने मोडले सर्व विक्रम, पंढरीत किती भाविकांची गर्दी? AI च्या सहाय्याने केली मोजणी; ‘एवढे’ लाख भाविकांचा हेड काउंटची नोंद

July 8, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

नवऱ्याचं डोकं सटकलं! दोन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोचा चार्जरच्या वायरनं गळा घोटला; नंतर स्वत:लाही संपवलं; सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना

July 8, 2025
Next Post

कौतुकास्पद! स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र नागपूर येथील जिल्हास्तरीय स्पर्धेत मुक्ताई बालगृहातील खेळाडूंचे घवघवीत यश; गोल्ड, सिल्वर, कास्य पदक पटकाविले

ताज्या बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 13, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता सातबाराची गरज भासणार नाही ; फक्त ‘हा’ क्रमांक असणार बंधनकारक

July 13, 2025
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून यांची लागणार वर्णी?

July 12, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

भयानक! वडिलांचे सहामहिन्यांपूर्वी निधन, जमीन नाही, स्वतःचे हक्काचे घर नव्हते, हलाखीच्या परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली १४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

July 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा