टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील सबजेलमध्ये क्षमतेपेक्षाही कैदयांची संख्या कोरोना कालावधीत वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सबजेलची क्षमता 32 कैदयांची असताना प्रत्यक्षात येथे सध्या 52 कैदी आहेत.
पंढरपूर कारागृहातील कैदी मंगळवेढा सबजेलमध्ये वर्ग केल्याने कैदयांची संख्या येथे वाढली आहे.
मंगळवेढा सबजेलमध्ये मध्यंतरी एक महिला कैदी वगळता 32 कैदी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची दमछाक झाली होती. गार्डवर बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनाही लागण झाल्याने कर्मचार्यांचीही डयूडी करण्यासाठी मानसिकता राहिलेली नव्हती.
सध्या मंगळवेढा सबजेलमध्ये 52 कैदी ठेवण्यात आल्याने कोंडवाडयासारखी अवस्था झाली आहे.
सध्या सर्वत्र कोरोना संसर्ग असल्याने पुन्हा पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवेढा पोलिस ठाण्यातील काही अधिकारी व पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने कर्मचार्यांची संख्या कमी झाली आहे.
परिणामी पोलिस प्रशासनास तारेवरची कसरत करत कमी मनुष्यबळावर पोलिस कर्मचार्यांना डबल डयुटया लावून हा गाडा चालविला जात आहे.
अशा स्थितीत पुन्हा पोलिस कर्मचार्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यास पोलिस कर्मचारी कोठून आणावायचे असा प्रश्न प्रशासनास भेडसावत आहे.
पंढरपूर कारागृहातून 10 कैदी मंगळवेढा सबजेलमध्ये वर्ग करण्यात आले आहेत. सध्या या कारागृहात 48 पुरुष व 2 महिला असे न्यायालयीन कोठडीत एकूण 50 जण आहेत. तर दोन पुरुष पोलिस कोठडीत आहेत. हे सबजेल ब्रिटीश कालावधीमधील कौलारू असल्यामुळे पावसाने सर्वत्र गळत आहे.
सबजेलमध्ये शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे आरोपींना त्यासाठी सातत्याने बाहेर काढावे लागते. या संधीचा फायदा घेत आरोपी पळून जाण्याची शक्यता नाकारत येत नसल्यामुळे गार्डवरच्या पोलिसांना डोळयात तेल घालून डयुटी करावी लागत आहे.
The sub-jail became housefull due to the classification of Pandharpur prisoners in Mangalwedha sub-jail
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज