मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या गराड्यात हरवत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तकाकडे वळविण्यासाठी व अभ्यासाची शिस्त अन् गोडी लावण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून

बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथे पहाटे ५ वा. आणि सांयकाळी ७वा. अभ्यासाचा भोंगा वाजविण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. गावातील विद्यार्थी आता अभ्यासाकडे वळू लागली आहेत.

येथील जिजामाता शिशुसंस्कार विद्यामंदिरचे शिक्षक महेश बुरगुटे आणि अमोल बाकले या शिक्षकांनी या अभिनव उपक्रमाचे पाऊल उचलले आहे.

अभ्यासाची शिस्त लावण्यासाठी सावित्रीबाई फुले जयंतीपासून दररोज अभ्यासाचा भोंगा सुरू केला आहे. याला विद्यार्थ्यांतून व पालकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दररोज भोंगा वाजवला की विद्यार्थी टी. व्ही. आणि मोबाईल पाहायचे बंद करतात. अभ्यासाला बसतात. सायंकाळी ७ ते रात्री ९ असा दोन तास अभ्यास करतात.

अध्ययनाची सवय लागली सोशल मीडियाची टाळेबंदी
यामुळे विद्यार्थ्यांची डिजिटल टाळेबंदी लागली आहे. सोशल मीडियाच्या गराड्यात अडकलेली लहान मुले, विद्यार्थी यांना बाहेर काढता आले आहे. विशेष म्हणजे स्वयंअध्ययनाची सवय त्यांना लागली आहे. मुले सलग दोन तास तरी अभ्यासास बसतात. यामुळे विद्यार्थ्यांत नियमितता व अभ्यासाची सवय निर्माण झाल्याचे अनेक पालकांनी सांगितले.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा
पहाटे ५ वाजता इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठीही भोंगा वाजवला जातो. गावात मध्यवर्ती ठिकाणी हा भोंगा बसविण्यात आला आहे. दोन्ही वेळेस विद्यार्थ्यांकडून बटन दाबले जाते. आवाज येताच पालक मुलांना अभ्यासास बसवितात. पहाटे भोंगा वाजताच घरातील टी.व्ही., मोबाईल बंद करावयास लावून अभ्यासपूर्ण वातावरण निर्माण करून देतात.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











