टीम मंगळवेढा टाईम्स ।
नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गाव दत्तक घ्यायचे आहे. ज्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, अशाच गावांची निवड विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आधी तिसऱ्या वर्षापासून फिल्ड व्हिजिट करावी लागत होती. नव्या नियमामुळे आता पहिल्या वर्षापासून गावात रुग्णसेवा करावी लागणार आहे.
अनेक गावांत डॉक्टर उपलब्ध नसतात. एखाद्या गावात डॉक्टर असले तरी ते एमबीबीएस झालेले नसतात. त्यामुळे गावकऱ्यांना चांगली रुग्णसेवा मिळत नाही. याचा विचार करून हा नवा बदल करण्यात आला आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा सुधारतील.
ऑगस्ट २०१९ मध्ये सादर करण्यात आलेला नवीन अभ्यासक्रमात फाऊंडेशन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत, ज्यामध्ये फॅमिली ॲडॉप्शन प्रोग्राम, योग, ध्यान यांचा समावेश आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी हे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) रुग्णसेवा देतात. महाविद्यालयात दरवर्षी १५० विद्यार्थी प्रवेश घेतात.
चार वर्षांचे एकूण सहाशे विद्यार्थी आता रुग्णसेवा देण्यासाठी सज्ज असणार आहेत.
सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय आहे.
या महाविद्यालयांत महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतून अनेक विद्यार्थी शिकण्यास येतात. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसते.
अनेकदा रुग्णांच्या समस्या कळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान देण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र तर ४३१ उपकेंद्र
सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी असे ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तर या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ४३१ उपकेंद्र आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत तातडीच्या वैद्यकीय सेवा, बाह्यरुग्ण कक्ष, आंतररुग्ण कक्ष, शस्त्रक्रिया सेवा, प्रयोगशाळा सेवा, विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सेवा देणे व उपकेंद्रांकडून संदर्भित केलेल्या रुग्णांवर उपचार या आरोग्य सेवा दिल्या जातात.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज