मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यात आरटीई प्रवेशांतर्गत आतापर्यंत १६७९ विद्यार्थ्यांना त्यांना हव्या त्या शाळेत मोफत प्रवेश मिळाला आहे. दरम्यान, प्राधान्य दिलेल्या शाळेत प्रवेश न मिळाल्याने पालकांनी अद्याप मुलांचा प्रवेश निश्चित केला नसल्याची माहिती समोर आली आहे.
आता प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशासाठी मोबाइलवर संदेश पाठविण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने सांगितले.
दरवर्षी तांत्रिक कारणामुळे लांबणीवर पडत असलेली आरटीई प्रवेशप्रक्रिया यंदा लवकरच सुरू करण्यात आली. आरटीई प्रवेशप्रक्रिया २०२५-२६ ला १४ जानेवारीपासून सुरुवात झाली. ठरविण्यात आलेल्या नियोजनाच्या तारखेनुसार प्रक्रिया पार पडत आहे.
१० मार्चपर्यंत प्रवेशासाठी मुदत दिली होती. त्यानुसार प्रवेश घेण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे पुन्हा प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार, की प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची या जागेसाठी निवड करणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
मोबाइलवरील संदेशाची वाट न पाहता प्रवेश निश्चित करावा
लॉटरी पध्दतीने प्रवेशप्रक्रिया संपली असून आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही हव्या त्या शाळेत प्रवेश न मिळाल्याने पालक प्रवेशापासून वंचित आहेत.
मोबाइलवरील संदेशाची वाट न पाहता आरटीईच्या संकेतस्थळावर पडताळणी व तपासणी करून आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा.- कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सोलापूर.
२८६ शाळांत आरटीईच्या अडीच हजार जागा…
आरटीई कायद्यानुसार प्रवेशासाठी जिल्ह्यातील २८६ शाळांची निवड करण्यात येणार आहे. या शाळेत जिल्ह्यात २ हजार ४४३ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. आतापर्यंत ७ बालकांची निवड अपात्र ठरली आहे. पडताळणीमध्ये कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अनेकांना प्रवेश घेता आला नाही
पालकांनी का फिरविली प्रवेशाकडे पाठ ?
आरटीई प्रवेशासाठी निवड झाल्यासंदर्भात आणि प्रवेश निश्चित करण्याची माहिती पालकांना दूरध्वनी संदेशाद्वारे दिली जाते. या संदेशाकडे पालकांचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळेच अद्याप काही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाहीत, असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. याशिवाय प्राधान्य दिलेल्या शाळेत प्रवेश न मिळाल्याचाही परिणाम प्रवेशावर झाल्याचे दिसून येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज