मंगळवेढा टाईम्स न्युज ।
“मिल्क ॲन्ड मिलेट व्हिलेज” भालेवाडी ता. मंगळवेढा येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल व हुरडा पार्टी यशस्वीपणे पार पडली.

या सहलीदरम्यान ग्रामपंचायतीमार्फत विद्यार्थ्यांना गावातील मंदिर, मामाचा वाडा, आडाची विहीर, दुग्ध उत्पादक केंद्र, ओपन जिम तसेच इंग्रजकालीन तलावाची माहितीपूर्ण फेरी घडवून आणण्यात आली. यासोबतच झाडे व विविध वनस्पतींबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.

दवले वस्ती येथे विद्यार्थी व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बाळुमामा मंदिरात विद्यार्थिनींनी एकांकिका सादर केली, तर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

मुला-मुलींसाठी पारंपरिक खेळ व बैलगाडी सफरीचे आयोजन करण्यात आले.

ग्रामपंचायतीतर्फे बक्षीस वितरण समारंभ पार पडला. जेवणानंतर विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली.

त्यानंतर पाहुण्यांसाठी जेवण, हुरडा पार्टी, मका भाजणे तसेच हरभरा वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास उप कृषी अधिकारी प्रशांत काटे, सरपंच डॉ. श्रीकांत दवले, उपसरपंच उषा ताई गवळी, ग्रामसेवक दत्तात्रय गायकवाड, कृषी सहाय्यक अभिजीत तवादारे,

तसेच एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पचे विपणन तज्ञ रोहित अदमाने, कृषी पर्यटन तज्ञ रमेश खळदकर, संवाद तज्ञ नितीन सुकलिकर, क्षेत्र समन्वयक दादा खाडे व भूषण महाजन उपस्थित होते तसेच या उपक्रमास प्रायमुव्ह, पुणे यांचे तांत्रिक सहाय्य लाभले.
या संपूर्ण उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पाहुणे व ग्रामस्थ मिळून सुमारे ४०० जणांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













