टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्रातून बारावीची परीक्षा तब्बल १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील संभाजीनगरच्या एका विद्यार्थीनीने १०० टक्के गुण मिळवले आहेत. संभाजीनगरच्या तनिषा बोरमणीकर या विद्यार्थीनीने हे यश मिळवले आहे.
तनिषा ही छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी कॉलेजमध्ये शिकत होती. बारावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारी तनिषा ही एकमेव मुलगी आहे. तनिषाना १०० टक्के गुण मिळाल्याने तिच्या कुटुंबियांनी आंनद व्यक्त केला आहे. तनिषाचे शिक्षक, कुटुंबियांनी तिच्या या यशाबाबत कौतुक केलं आहे.
तनिषाने बोलताना सांगितले की, तिला ९५ टक्के गुण मिळतील, अशी आशा होती. मात्र, १०० टक्के मिळाल्याने तिला खूप आनंद झाला आहे. तीने वर्षभर अकाउंट्स या विषयाचा अभ्यास केला. त्या विषयावर जास्त भर दिला. शेवटच्या दोन महिन्यात तिने बाकीच्या विषयांचा अभ्यास केला.
तिला तिच्या शिक्षकांनी खूप साथ दिली. ती बुद्धिबळ खेळायची. त्यामुळे तिचा अभ्यास बुडायचा. तिला तिच्या शिक्षकांनी आणि कॉलेजने खूप सपोर्ट केला. ती खेळामुळे कॉलेजला जास्त जाऊ शकले नाही. पण शिक्षकांच्या सपोर्टने तिने हे यश प्राप्त केल्याचं तिने यावेळी बोलताना सांगितले आहे.
तनिषाचा आवडता विषय अकंउट्स होता. त्यात तिला ९५ मार्क्स मिळाले. तिला ओसीएम, इकोनॉमिक्स आणि पाली या विषयात १०० मार्क्स मिळाले आहेत.
बारावीच्या परिक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. या वर्षी १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती.
त्यापैकी एकूण १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी एकूण ९१.६० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. राज्यात कोकण विभागात ९७.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज