mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुर जिल्ह्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध; शहर व जिल्ह्यासाठी ‘हे’ नवे नियम असणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 28, 2021
in सोलापूर
Lockdown! राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढवला; 15 मे पर्यंत असणार कडक निर्बंध

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोना संसर्गात तिसर्‍या स्तरावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आज सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यासह शहरातही सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंतच व्यवहार सुरू राहतील.

त्यानंतर अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. शनिवार व रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

शहरासाठीचा तसा प्रस्ताव मनपा आयुक्‍त पी शिवशंकर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठविला आहे. त्यांनुसार ते रविवारी आदेश जारी करणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊनचा फेरा सुरूच आहे. गेल्यावर्षी अनेक दिवस लॉकडाऊन होते. पुन्हा कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर जानेवारीपासून अनलॉक झाले होते. त्यानंतर पुन्हा मार्च महिन्यात दुसर्‍या लाटेमुळे लॉकडाऊन जारी करण्यात आले.

मे महिन्यात मात्र पुन्हा लाट ओसरल्यानंतर शहरात जूनपासून निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र, ग्रामीण भागात दुपारी चारपर्यंत सूट देण्यात आली होती.

आता पुन्हा म्युकर मायकोसिससह तिसर्‍या लाटेचे आव्हान समोर उभा ठाकले आहे. त्यातच डेल्टा प्लस हा नवा व्हायरस आढळून आल्याने पुन्हा कडक निर्बंध करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शासनाने यासंदर्भात नुकताच तसा निर्णय घेतला आहे.

याअंतर्गत सोलापूर जिल्हा तिसर्‍या स्तरावर आहेत. तिसर्‍या स्तरावरील निर्बंध ग्रामीणमध्ये आजही कायम आहेत. मात्र शहरातील पूर्ण लॉकडाऊन हटले होते. त्यावर मात्र आता पुन्हा मर्यादा येणार आहेत. यापूर्वी सोलापूर शहर दुसर्‍या स्तरावर होते.

मात्र आता पहिला व दुसरा स्तर रद्द करून तिसरा, चौथा पाचवा स्तरानुसासर कोरोना संसर्गाची गणना केली आहे. त्यामुळे राज्यातील 14 जिल्ह्यांची तिसर्‍या स्तरामध्ये सोलापूर शहराचा समावेश आहे. त्यामुळे या नव्या कडक निर्बंधनानुसार शहरात पूर्वी दिवसभर पूर्णत: सवलत होती.

त्याऐवजी आता फक्‍त सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंतच सर्व व्यवहार खुले राहतील. शनिवारी व रविवारी मात्र शहरासह जिल्ह्यात कडक लॉकडाऊन राहणार आहे. या कालावधीत वैद्यकीय सेवा व मेडिकल हे चोवीस तास कायम चालू राहतील.

या नव्या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे. जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हाधिकारी यांच्याकडे महापालिकेकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

या प्रस्तावाला मान्यता मिळताच हे रविवारी रात्रीपासून नव्याने आदेश लागू करण्यात येतील. हे निर्बंध पुढील शासन निर्णयापर्यंत लागू राहणार आहेत.

शहर व जिल्ह्यासाठी नवे नियम

अत्यावश्यक दुकानांसह सर्वच आस्थापना सकाळी 7 ते 4 या वेळेत चालू.

शनिवारी-रविवारी मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता दोन दिवस कडक लॉकडाऊन राहणार.

शहरातील हॉटेल्स 7 ते 4 चालू राहतील. मात्र, सायंकाळी 4 ते 9 या वेळेत पार्सल सेवा सुरू ठेवतील.

करमणुकीचे केंद्र पूर्णतः बंद राहणार आहेत.

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये संख्येवर पुन्हा नियंत्रण येणार 100 लोकांमध्ये उरकावे लागणार लग्‍न.

जीम, सलून, स्पा आदी दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र 50 टक्के क्षमतेने.

शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये 50 टक्के क्षमता.

शासन आदेशानुसार शहरात कडक निर्बंध लागू करण्यासाठी जिल्ह्याधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या लेखी आदेशानंतर शहरात कडक निर्बंध लावण्यात येतील.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लॉकडाउनसोलापूर ग्रामीण पोलीस

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सदस्यांची जात वैधता पडताळणी होणार; सदस्यांची यादी मागितली

February 22, 2026
Next Post
सोलापूरकरांच्या रेट्यामुळे आजपासून व्यापारपेठ खुली; शहरातील दुकाने आजपासून ‘या’ वेळेपर्यंत राहणार सुरू

मंगळवेढा ब्रेकिंग! शहर व लगतच्या ग्रामपंचायत हद्दीत दुकाने 'या' वेळेपर्यंत सुरू राहणार

ताज्या बातम्या

मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

February 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा