टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील बोराळे नाका येथे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोध कायदे निषेधार्थ व दिल्ली येथे शेतकरी अंदोलन करण्यात येत असलेल्या शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ मंगळवेढा शहर व तालुका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, अन्य विविध संघटना यांचे नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे समाधान क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात शेतकरी बांधवांच्या व्यथा व्यक्त करत केंद्र सरकार हे शेतकरी व सामान्य माणसाचे विरोधी नवीन नवीन कायदे आमलात आणून उद्योगपती यांचे हित जोपासत आहे अशा सरकारचा संभाजी ब्रिगेड मंगळवेढा याचे वतीने निषेध व्यक्त केला.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भारत बेदरे यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टिका करत शेतकरी बांधवांना केंद्र सरकारने देशद्रोही म्हटलेचा निषेध मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने नोंदविला.
मंगळवेढा काँग्रेसचे वतीने युवक नेते मनोज माळी केंद्र सरकारने शेतकरी अंदोलन मार्गावर जसे खिळे रोवले आहेत तसे सीमेवर केले असते तर चिनने अतिक्रमण केले नसते वगैरे मनोगत व्यक्त करत निषेध केला.
किसान शेतकरी संघटनेचे सिध्देश्वर हेंबाडे यांनी केंद्र सरकार शेतकरी बांधवांना करत असलेल्या अन्याय म्हणजे ह्या सरकारचे पापाचा घडा भरला असून ह्याना हयाची जागा दाखवली पाहीजे ते शेतकरी करून दाखवतील म्हणून निषेध व्यक्त केला.
मंगळवेढा नगरपरिषद तर्फे अंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा सौ. अरूणा माळी यानी केंद्र सरकार वर कायद्याचे विरोधी टिका करत शेतकरी वर्गाचा सूड घेणेचे उददेशाने उदयोजकांना हाताशी धरून सत्ता जोरावर मनमानी कायदे निषेधार्थ अंदोलनास साथ दिली.
मंगळवेढा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प. महाराष्ट्र अध्यक्ष राहूल घुले यांनी केंद्र सरकार हे जनेवराची कातडी घातलेला आहे. ह्याला सामान्य जनतेचे शेतकरी वर्गाचे हिताचे रक्षण करणे याचे काही नाही आज सत्तर दिवसापासुन दिल्ली येथे ऊन वारा पाऊस सोसून शेतकरी अंदोलन करत आहेत कित्येक शेतकरी शहीद झाले पण शेतकरी कायदा रद्द करणे ऐवजी अंदोलन कसे चिगळता येईल यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात या सरकारचा निषेध केला.
यावेळी सुत्रसंचालन मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष संदीप बुरकुल यानी केले. केंद्र सरकारच्या शेती कायद्याचे विरोधी रास्ता रोको आंदोलन करीता मंगळवेढा शहरातून व तालुक्यातून काँग्रेस पक्षाचे नंदकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग चे विजय खवतोडे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मारूती वाकडे,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मुजम्मील काझी, काँग्रेस शहराध्यक्ष राजाराम सुर्यवंशी,पक्ष नेते अजित जगताप,नगरसेवक प्रवीण खवतोडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, बिराजदार, आबा खांडेकर, शहराध्यक्ष हर्षद डोरले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य पी बी पाटील सर,सौ.संगीता कट्टे पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, सौ.प्रफुलता स्वामी शहराध्य, मुरलीधर घुले, सोमनाथ माळी, प्रविण हजारे, दादा टाकणे, दयानंद सोनगे, संतोष सोनगे, पंडित गवळी, नाथा ऐवळे, अमोल बचुटे, मंदा सावंजी, सारिका सलगर , रेखा साळुंखे , स्मिता अवघडे , सुनीता मेटकरी, महानंदा धुमाळे, विनायक दत्तू,अजित गायकवाड, स्वप्निल भगरे, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्तिथ होते .
मंगळवेढा येथे महाविकास आघाडी यांचे मार्फत केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या विरोधी चूल पेटवून अंदोलन
मंगळवेढा येथील बोराळे नाका येथे केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शहर व तालुका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस महिला, काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, अन्य विविध संघटना यांचे नेतृत्वाखाली चूल पेटवून अंदोलन करण्यात आले.
संध्या संपूर्ण जगभरात कोरोनो रोगाचा थैमान माजला असताना मागील दहा महीने पासून सामान्य माणसाला उपासमारीची वेळ आली आहे हाताला कामधंदा नाही.
कुटुंबीयांचे पालनपोषणाची जबाबदारी यातच वाढलेली महागाई व शेतकरी अंदोलन आशा विविध घटना मनुष्य जिवन खिळखिळा करत असताना सामान्य वर्गाचा सूड घेणेचे उददेशाने उदयोजकांना हाताशी धरून सत्ता जोरावर मनमानी कायदे करणे गॅस दरवाढीचा मनमानी कारभार सुरु करणे.
सरकार हे जनतेचे हितासाठी आहे की उदयोजकांचे हिताचे हे समजणे अवघड झाले आहे. भारत देश हा शेती व त्यावर पुरक अशा कामावर जाणारा देश असताना शेतकरी वर्गाचे कबरटे मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकार हे जनावराची कातडी घातलेले सरकार आहे.
सरकारने घेतलेला गॅस दरवाढीचा निर्णय त्वरित मागे घेवून सामान्य जनतेला न्याय दयावा म्हणून मंगळवेढा महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी यांचे मार्फत मा. तहसीलदार मंगळवेढा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी गॅस दरवाढीच्या आंदोलन करीता मंगळवेढा शहरातून व तालुक्यातून मंगळवेढा नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. अरूणा माळी, सौ.संगीता कट्टे पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, सौ.प्रफुलता स्वामी शहराध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे नंदकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग चे विजय खवतोडे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मारूती वाकडे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भारत बेदरे, शहराध्यक्ष मुजम्मील काझी, काँग्रेस शहराध्यक्ष राजाराम सुर्यवंशी,पक्ष नेते अजित जगताप,नगरसेवक प्रवीण खवतोडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहूल घुले, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, बिराजदार, आबा खांडेकर, शहराध्यक्ष हर्षद डोरले, किसान शेतकरी संघटनेचे सिध्देश्वर हेंबाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य पी बी पाटील सर, संभाजी ब्रिगेड चे समाधान क्षीरसागर व संदीप फडतरे, राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष संदीप बुरकुल, मुरलीधर घुले, सोमनाथ माळी, प्रविण हजारे, दादा टाकणे, दयानंद सोनगे, संतोष सोनगे, पंडित गवळी, नाथा ऐवळे, अमोल बचुटे, मंदा सावंजी, सारिका सलगर , रेखा साळुंखे , स्मिता अवघडे , सुनीता मेटकरी, महानंदा धुमाळे, विनायक दत्तू,अजित गायकवाड, स्वप्निल भगरे, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्तिथ होते .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज