टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिवप्रेमी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी शिवप्रेमींची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती. दोन वर्षांपूर्वी पुतळा पुण्याहून आणून एमआयडीसीत ठेवला होता.
अखेर शिवप्रेमींच्या मागणीखातर शहरातील शिवभक्तांनी एकत्र येऊन मंगळवारी रात्री उशिरा चिबुतऱ्यावर पुतळा बसवला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही परवानगी न मिळाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून झाकून ठेवलेला महाराजांचा अश्वारूढ पुतळा अखेर ६५० ते ७०० शिवभक्तानी शिवप्रेमी चौकातील विराजमान केला.
शिवभक्तांनी पुतळा समिती स्थापून लोक वर्गणी काढत गतवर्षी पुतळा आणला होता. सर्व विभागाचे ना हरकत कागदपत्र देऊन अंतिम मंजुरीसाठी रीतसरपणे परवानगी मागितली असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत परवानगी मिळालेली नाही.
येथील पुतळा परिसर करण्यासाठी ७५ लाखांचा निधी मिळाला असून, या कामाचे कार्यारंभ आदेश ठेकेदाराला मिळाला आहे. कंपाउंड झाल्यानंतर पुतळा बसणे अडचणीचे होणार असल्यामुळे शिवभक्तांनी एकत्र येऊन पुतळा बसवला. पुतळा झाकून ठेवलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
लवकरच अनावरण
महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून एक वर्ष झाले जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी एक वर्षापूर्वी प्रस्ताव सादर केलेला आहे. सर्व कागदपत्रे जोडूनही अद्याप परवानगी दिलेली नाही. पुतळा परिसरात सुशोभीकरण केले जाणार आहे.
त्यास अडचण होऊ नये म्हणून मंगळवारी शिवभक्तांनी एकत्र येऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुतळा बसवला. छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, मनोज जरांगे-पाटील व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.-अजित जगताप, अध्यक्ष, अश्वारूढ पुतळा समिती
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज