टीम मंगळवेढा टाइम्स।
काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकसष्टी निमित्ताने आठ एप्रिल रोजी सोलापुरात विविध मंत्र्यांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा दौरा कार्यक्रम आलेला आहे, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेसुद्धा शुक्रवारी सोलापुरात आहेत.
त्यांच्या दौऱ्यामध्ये सर्वात पहिला कार्यक्रम काँग्रेस भवनात आहे, सकाळी साडेदहा वाजता थोरात हे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीस आमदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.
काँग्रेस भवन या ठिकाणी महसूल मंत्री थोरात हे नागरिकांचे निवेदने स्वीकारणार आहेत त्यासाठी महसूलचे प्रश्न थेट मंत्र्यांसमोर मांडण्याची नागरिकांना चांगली संधी आहे.
दरम्यान या बैठकीला काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आपली निवेदने देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज