mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘विठ्ठल’सह चार सहकारी कारखान्यांवर प्रशासक नेमा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 21, 2021
in सोलापूर, राज्य
‘विठ्ठल’सह चार सहकारी कारखान्यांवर प्रशासक नेमा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सध्या शेतकरी कोरोनामुळे अडचणीत असताना चेअरमन मंडळी रोज पुणे आणि मुंबईच्या वार्‍या करत आहेत आणि दुसरा सीझन सुरू होण्याची वेळ आली तरी शेतकऱ्यांना पहिले बिल मिळत नाही,

अशा परिस्थितीत आम्ही आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शरद पवार यांना भेटून या तालुक्यातला सहकार वाचवायचा असेल,

तर या कारखान्याचे निष्क्रिय संचालक मंडळ बरखास्त करा आणि या कारखान्यांवर तुकाराम मुंढेसारखा सक्षम प्रशासक नेमावा, अशी मागणी करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.

ते पुढे म्हणाले की, श्री विठ्ठलसह अनेक कारखान्यावर राज्य सहकारी बॅंकेची जप्तीची टांगती तलवार कायम आहे. ज्या कारखान्याकडे थकीत ऊस आणि कामगारांचे पगार तोडणी वाहतूक बिलासंदर्भात थकीत रक्कम आहे.

त्या संदर्भात गेल्या अकरा महिन्यांपासून निवेदन देत आंदोलने करत शेतकरी संघटनेने हा प्रश्न समोर आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु दुसरा सिजन तोंडावर आला तरी या चेअरमन आणि संचालक मंडळाला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही.

आता यांच्या विरोधात आंदोलन करायची आम्हाला देखील लाज वाटू लागली आहे. परंतु या संचालक मंडळाला काही घाम येत नाही.

सभासद कामगार व संस्था गरिब झाली.तर मग चेअरमन व संचालक मंडळाकडे गाड्या, बंगले कोट्यवधीची स्व मालकीची मालमत्ता कुठून आली? अशी परिस्थिती झाल्यामुळे आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतली आहे.

खरं तर आज या चेअरमन मंडळीने शेतकरी सभासदां समोर येऊन कारखाने कधी सुरू होणार आहेत, कारखान्याचे बिल कधी मिळणार आहे. कामगारांचे पगार कधी मिळणार आहेत, तोडणी वाहतुकीचे पैसे कधी मिळणार आहेत.

या गोष्टी जाहीर करणे गरजेचे आहे. परंतु अशावेळी सुद्धा हे सर्व चारी कारखान्याचे चेअरमन नॉट रिचेबल आहेत आणि कारखान्याचा कारभार रामभरोसे चालू आहे. त्यामुळे शेतकरी सभासद संभ्रमावस्थेत आहेत.

ट्रॅक्टर तर अक्षरशः फायनान्सने ओढून नेण्याची वेळ आलेली आहे. कामगारांच्या घरातील बायका दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जायची वेळ आलेली आहे. अशी परिस्थिती गंभीर परिस्थिती असताना शेतकरी कोरोनामुळे अडचणीत असताना चेअरमन मंडळी रोज पुणे आणि मुंबईच्या वार्‍या करत आहेत आणि दुसरा सीझन सुरू होण्याची वेळ आली तरी आमचे पहिले बिल मिळत नाही,

अशा परिस्थितीत आम्ही आता मुख्यमंत्री व शरद पवार यांना भेटून या तालुक्यातील सहकार वाचवायचा असेल तर या कारखान्याचे निष्क्रिय संचालक मंडळ बरखास्त करा आणि या कारखान्यांवर तुकाराम मुंढेसारखा सक्षम प्रशासक नेमा

आणि शासकीय यंत्रणेमार्फत हे कारखाने यशस्वीपणे चालवून सांगली आणि कोल्हापूर प्रमाणे दराची स्पर्धा करावी, अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत, असे स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा ऊस उत्पादनात पहिल्या क्रमांकावर

एकीकडे आपल्याच तालुक्यातील कारखानदारीत नवखे असलेले अभिजीत पाटील जुने कारखाने भाडेतत्त्वावर घेऊन चांगले चालवत आहेत.

तर दुसरीकडे श्री विठ्ठल भीमा दामाजी सहकार शिरोमणी हे शेतकऱ्यांचे फुकटात नेतृत्व करण्यासाठी मिळालेले कारखाने चेअरमन व संचालक यांच्या भ्रष्ट कारभारामुळे शेवटच्या घटका मोजत आहेत.

सोलापूर जिल्हा ऊस उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असताना ऊस दराच्या बाबतीत शेवटचा क्रमांक का लागतो, सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर 3100 टन दर मिळतो, मग इथं का नाही, असा सवाल सचिन पाटील यांनी केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: स्वाभिमानी शेतकरी संघटना

संबंधित बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
Next Post
शिक्षकांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या लढ्याला पहिले यश, शिक्षक भरतीवरील स्थगिती शासनाने उठवली

सोलापूर जिल्हा परिषदेचे 'एवढे' शिक्षक झाले मुख्याध्यापक; शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण

ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..